For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसला मतदान करा

10:33 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसला मतदान करा
Advertisement

मृणाल हेब्बाळकर : ग्रामीण मतदारसंघात प्रचार

Advertisement

बेळगाव : मी अभियांत्रिकी पदवीधर असून बेळगाव जिल्ह्याच्या विकासाबाबत मला स्पष्ट कल्पना आहे. जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करण्याच्या उद्देशाने लोकसभा निवडणुकीला उभा आहे. नागरिकांनी बहुमोल मत देऊन सहकार्य करावे, असे आवाहन लोकसभा उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव लोकसभा मतदारसंघातील मुतगा, शिंदोळी, बसरीकट्टी आदी गावांमध्ये प्रचार करून ते बोलत होते. देशाच्या विकासात काँग्रेसने मोठे योगदान दिले आहे. काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना देशाचा आणि राज्याचा विकास झाला आहे. आपल्या मातोश्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी अनेक विकासकामे राबविली आहेत. बेळगाव लोकसभा मतदारसंघातून महत्त्वाकांक्षी योजना राबविण्याबरोबरच मतदारसंघाच्या सर्वांगिण विकासाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, काँग्रेसकडून नेहमीच एकता राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्वांना एकत्र घेऊन विकास साधण्यात आला आहे. यासाठी कोणताच भेदभाव- पक्षपात न करता गॅरंटी योजना राबविल्या जात आहेत. राज्यातील प्रत्येक कुटुंबाला गॅरंटी योजनांच्या माध्यमातून न्याय देण्यात आला आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यासाठी तरुण उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement
Advertisement
Tags :

.