For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न पाहण्यासाठी भाजपला मतदान करा

10:19 AM Apr 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
मोदींच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे स्वप्न पाहण्यासाठी भाजपला मतदान करा

कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांचे मतदारांना आवाहन

Advertisement

वार्ताहर /नंदगड

गेल्या पाचशे वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले अयोध्या येथील राम मंदिर पंतप्रधान मोदीजी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी यांनी पूर्णत्वाला आणले. 370 कलम रद्द केला. चांद्रयानपासून मोबाईल नेटवर्क गावागावांपर्यंत पोहचविले. गोरगरिबांसाठी विविध योजना राबवून वस्ती, पाणी, रस्ते या सुविधा मिळवून दिल्या. विविध आरोग्य संबंधित योजना राबवून आयुष्य सुखकर बनवले. भारत देशालाच नव्हेतर जगालाही मोदींसारख्या नेत्यांचे नेतृत्व हवे आहे. देशातील समस्त जनतेने विकसित भारताचे स्वप्न पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या उमेदवारांना मतदान करून विजयी करा, असे आवाहन कारवार लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी खानापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. खानापूरच्या बाबतीत बोलताना हेगडे म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून खानापूर तालुक्याशी माझा संबंध आहे. येथील कुस्ती आखाड्याला मी भेट दिली होती. शिक्षणमंत्री असताना येथील अनेक विनाअनुदानित शाळांचे अनुदान मंजूर केले आहे. शिक्षकांची कमतरता ओळखून अतिथी शिक्षकांची नियुक्ती करून शिक्षणाची समस्या सोडवली आहे. खानापुरातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शैक्षणिक समस्या मार्गी लावून तालुक्याचा सर्वांगीण विकास साधणार आहे. खानापुरातील मतदार भाजपला मानणारा आहे. खानापूरच्या जनतेसाठी मी आवाज म्हणून उभा राहीन. त्यासाठी भाजपचे उमेदवार म्हणून मला मोठ्या संख्येने मतदान करावे, अशी विनंती केली. व कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर जाऊन काम करावे, असे आवाहनही केले.

Advertisement

खानापुरातील देवदेवतांचे घेतले दर्शन

Advertisement

यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, भाजपाचे बेळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष सुभाष पाटील, निधर्मी जनता दलाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष शंकर माडलगी, खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, अॅड. चेतन मणेरीकर, जोतिबा रेमाणी, सुरेश देसाई, प्रमोद कोचेरी, सदानंद पाटील, पंडित ओगले, बाबुराव देसाई, धनश्री सरदेसाई, लक्ष्मण मोरे, किरण यळ्ळूरकर आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. खानापूर शहरातील चौराशी देवीचे पूजन करून भाजपाच्या तालुक्यातील प्रचार दौऱ्याला सुरुवात झाली. खानापूर शहरातील छत्रपती शिवाजीराजांच्या पुतळ्dयाला, जगत्ज्योती बसवेश्वर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्dयाला विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी हार घालून अभिवादन केले. हेगडे यांनी खानापुरातील लक्ष्मीदेवी व रवळनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर तालुक्याच्या ठिकठिकाणी त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

Advertisement
Tags :
×

.