For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वच्छ चारित्र्याच्या सरकारसाठी भाजपलाच मतदान करा

10:23 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वच्छ चारित्र्याच्या सरकारसाठी भाजपलाच मतदान करा
Advertisement

उमेदवार जगदीश शेट्टर यांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : पालकमंत्री म्हणून बेळगाव जिल्ह्यात अनेक विकासात्मक कामे राबविली आहेत. बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जनसंपर्क असल्यामुळेच भरभरून प्रतिसाद मिळत आहे. लोकांच्या आशीर्वादामुळेच भरघोस मतांनी बेळगावचा खासदार म्हणून निवडून येईन, असा विश्वास भाजपचे लोकसभा उमेदवार जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. सोमवारी जगदीश शेट्टर यांनी बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघात प्रचार केला. शौर्य चौक, स्वामी विवेकानंद चौक, हनुमान मंदिर, संयुक्त महाराष्ट्र चौक, गवळी गल्ली, सरदार्स मैदान या परिसरात चाय पे चर्चाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ चारित्र्याचे सरकार पुन्हा हवे असून भाजपलाच मतदान करा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी भाजप नेते शंकरगौडा पाटील, जि. पं. माजी सदस्य रमेश देशपांडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.