For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किल्ला तलावात बोटींगद्वारे मतदान जागृती

11:00 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
किल्ला तलावात बोटींगद्वारे मतदान जागृती
Advertisement

जिल्हा स्वीप समितीचा उपक्रम : आगळ्यावेगळ्या जागृती मोहिमेने वेधले लक्ष

Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जागृतीच्या उद्देशाने जिल्हा स्वीप समितीकडून किल्ला तलावात मंगळवारी बोटींग करून मतदान जागृती करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या जागृती मोहिमेने सर्वांचे लक्ष वेधले होते. जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी या जागृती मोहिमेला चालना दिली. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले, बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघासाठी दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. सर्व मतदारांनी सक्तीने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. देशाच्या घटनेने मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकाला दिला आहे. मतदाराने तो अधिकार वाया न घालविता मतदान करावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा स्वीप समितीकडून मतदान जागृतीसाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. मतदारांमध्ये जागृतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून अथक परिश्रम घेतले जात आहेत. यासाठी मतदारांनी मतदान करून हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा स्वीप समितीकडून बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघांमध्ये जागृती अभियान राबविण्यात येत आहे.

 देश बांधणीमध्ये सहभागी व्हावे

Advertisement

मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून देश बांधणीमध्ये सहभागी व्हावे, असे चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष राहुल शिंदे यांनी सांगितले. आकर्षक मतदान जागृती फलक घेऊन किल्ला तलावामध्ये बोटींगद्वारे जागृती करण्यात आली. निवडणूक पर्व देशाचा गर्व, मतदान तुमचा हक्क आणि जबाबदारी, नैतिक मतदान करा, माझे मत माझा हक्क, तुमचे मत तुमचे भविष्य, तुमचे मत अमूल्य आहे, असे घोषणा फलक घेऊन मतदारामध्ये जागृती करण्यात आली. यावेळी जि. पं. चे मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटीर, योजना संचालक कृष्णराज, लेखाधिकारी गंगा हिरेमठ, मनपा अधिकारी, कर्मचारी, जि. पं. कर्मचारी आदींनी या मतदान जागृतीत सहभाग घेतला होता.

Advertisement
Tags :

.