कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Solapur : उमरगामध्ये नगरपरिषदेच्यावतीने मतदान जनजागृती रॅली

03:51 PM Nov 16, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement

                        उमरग्यात शहरभर मतदान जनजागृती रॅली पडली पार 

Advertisement

उमरगा : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या निमित्ताने नगरपरिषद कार्यालयाच्यावतीने शनिवार, १५ नोव्हेंबर रोजी कार्यालयापासून ते शहरातील विविध भागातून मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली होती.

Advertisement

रॅलीच्या माध्यमातून शहरातील मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान करुन लोकशाही बळकट करण्यासाठी मदत करावे, असे आवाहन मतदारांना करण्यात आले. रॅलीचे उद्घाटन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांनी केले.

रॅलीमध्ये लेखापाल कृष्णा काळे, संगणक अभियंता महेश शिंदे, नगर अभियंता राजन वाघमारे, सहाय्यक लेखापाल मनोज जंगले, रोखपाल किरण नीरसागर, कार्यालयीन अधीक्षक प्रसाद माळी, पाणीपुरवठा अभियंता गणेश पुरी, कर व निर्धारण अधिकारी मुसा मुबारक, आस्थापना अधिकारी आरुणा कोडगावे, प्रशासकीय अधिकारी प्रशांत वारभुवन, वरिष्ठ लिपीक विशाल माळी, लिपीक ईरफान शेख, लिपीक रमेश हजारे, स्वच्छता निरीक्षक विकास दनाने,

पाणी पुरवठा अधिकारी शेषेराव भोसले, स्वच्छता अधिकारी मंजूर शेख, बाळू गाने, अनुप राऊत, माधव नागराळे, राजू कटके, बंटी चौगुले, सलीम सास्तुरे, मौलाली जमादार, उध्दव कांबळे, अनिकेत कांबळे, असलम शेख, यलप्पा दंडगुले, आकाश सरपे, सतीश कांबळे, रमेश शिंदे, बाळू गायकवाड, गुरुनाथ कांबळे, रोहीत सुरवसे, लखण चव्हाण, अंबिका माने, लखन आबाचणे, ओंकार रणदिवे, ऋषिकेश सरपे आदी कर्मचारी, विविध शाळांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक यांचा सहभाग होता.

Advertisement
Tags :
#ElectionRally#MunicipalElectionUmergaVoteForDemocracyVoterAwarenessVotingRally
Next Article