महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रशियात भूकंपानंतर ज्वालामुखीमध्ये स्फोट

06:41 AM Aug 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

8 किमी उंचीपर्यंत धुराचे लोट

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

Advertisement

रशियाच्या पूर्व किनारपट्टीवर रविवारी सकाळी 7.0 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपामुळे परिसरात असलेल्या शिवेलुच नावाच्या ज्वालामुखीचा स्फोट झाला. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर धुराचे लोट समुद्रकिनाऱ्यापासून 8 किमी उंचीपर्यंत दिसत होते. हा ज्वालामुखी रशियाच्या पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहरापासून सुमारे 450 किमी अंतरावर आहे. या शहराची लोकसंख्या 1 लाख 80 हजार आहे. मात्र, या स्फोटात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. शिवेलुच हा रशियामधील सर्वात सक्रिय ज्वालामुखी आहे. गेल्यावषी 11 एप्रिललाही स्फोट झाला होता. यानंतर राख आणि धुराचे 20 किलोमीटर उंच लोट उठले होते. हा धूर 1 लाख 8 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरला होता.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहरापासून सुमारे 88 किमी अंतरावर समुद्रात असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेतील त्सुनामी चेतावणी प्रणालीने भूकंपाच्या केंद्रापासून 300 किमीच्या परिघात सुनामीचा इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article