व्होडाफोन-आयडिया 5 जी सेवा सुरु करणार
दिल्ली-मुंबईपासून सुरु होणार सेवा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
व्होडाफोन-आयडिया (व्हिआय) ने इक्विटी फंडिंगद्वारे मार्च 2025 पर्यंत नेक्स्ट जनरेशन (5जी) व्यावसायिक सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जगबीर सिंग म्हणाले की, कंपनी पहिल्या टप्प्यात दिल्ली आणि मुंबई येथे सेवा सुरू करणार आहे आणि पुढील वर्षी जूनपर्यंत भारतातील किमान 90 टक्के लोकसंख्या 4 जी सेवेने कव्हर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
रकमेचा वापर सेवेसाठी
व्हीआयने नुकतेच 24,000 कोटी उभे केले आहेत, ज्यापैकी 18,000 कोटी फॉलो-ऑन सार्वजनिक ऑफरमधून आले आहेत. कंपनी म्हणते की बहुतेक निधी 4 जी कव्हरेज मजबूत करण्यासाठी आणि 5जी सेवा लॉन्च करण्यासाठी वापरला जाणार आहे. ज्यामुळे ते रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या प्रतिस्पर्ध्यांविरूद्ध अधिक स्पर्धात्मक होणार आहेत. कंपनी चिनी उत्पादकांसोबत नेटवर्क कराराचे नूतनीकरण न करण्याची योजना आखत आहे. तसेच, व्होडाफोन आयडिया व्हर्च्युअलाइज्ड रेडिओ अॅक्सेस नेटवर्क वर दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगसोबत काम करत आहे, परंतु ओपन आरएएनसह त्याचा अनुभव फारसा सकारात्मक नाही. भारत सरकारने गेल्या वर्षी व्होडाफोन आयडियाच्या कंपनीच्या कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर केले होते, ज्यामुळे ती 33.5 टक्के स्टेकसह सर्वात मोठी शेअरहोल्डर बनली होती.
ग्राहक वाढवण्यावर भर
सिंग म्हणाले की, सध्या सुमारे 1.03 अब्ज लोक 4जी कव्हरेज अंतर्गत येतात, जे सुमारे 77 टक्के आहे. ते 90 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य असून पुढील वर्षी जूनपर्यंत हे लक्ष्य गाठता येईल. नेटवर्क पूर्ण होण्याअगोदर कंपनी ग्राहकांच्या तोट्यावर अंकुश ठेवण्यास सक्षम असेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. प्रतिस्पर्धी व्होडाफोन आयडियाने ऑक्टोबर 2022 मध्ये प्रथम या 5जी सेवा सुरू केल्या. यूकेचा व्होडाफोन समूह आणि भारताचा आदित्य बिर्ला समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम 17 परवानाधारक क्षेत्रांमध्ये 4 जी आणि 5जी दोन्ही सेवांवर लक्ष केंद्रित करणार आहे, असेही सिंह म्हणाले.