For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडसटॉवरमधील हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत व्होडाफोन समूह

06:50 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
इंडसटॉवरमधील हिस्सेदारी विकण्याच्या तयारीत व्होडाफोन समूह
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दूरसंचार क्षेत्रातील कंपनी व्होडाफोन समूह येत्या आठवड्यात ब्लॉक डीलच्या माध्यमातून इंडसटॉवरमधील संपूर्ण हिस्सेदारी विक्री करणार असल्याचे समजते. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

सदरची कंपनी ही रक्कम आपले जुने कर्ज फेडण्यासाठी वापरणार आहे. मोबाईल टॉवरची उभारणी करणाऱ्या इंडस टॉवरमध्ये व्होडाफोन समूहाच्या विविध कंपन्यांची जवळपास 21.5 टक्के हिस्सेदारी आहे. शेअर बाजारामध्ये ही बातमी पसरल्यानंतर व्होडाफोन आयडियाचा समभाग शुक्रवारी 4.8 टक्के इतका वाढला होता. सदरच्या हिस्सेदारी विक्रीकरिता व्होडाफोन समूहाने बँक ऑफ अमेरिका, मॉर्गन स्टॅनले आणि बीएनपी पारिबास यांना नियुक्त केले आहे. मात्र या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. व्होडाफोन समूहाने 2022 मध्ये आपली 28 टक्के  हिस्सेदारी विकण्याची घोषणा केली होती. मात्र त्यापैकी आतापर्यंत काहीशी हिस्सेदारी कंपनी विकू शकली आहे. समूहावर सध्याला 42.17 अब्ज डॉलर्सचे कर्ज आहे.

Advertisement

इंडसटॉवरची महती

इंडसटॉवर ही जगातील सर्वात मोठी टॉवर उभारणारी कंपनी मानली जाते. यानंतर भारतातील दूरसंचार कंपनी भारती एअरटेल ही दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असून ही इंडसटॉवरची भागधारक आहे. इंडसटॉवरमध्ये खासगी इक्विटी फर्म केकेआर आणि कॅनडातील पेंन्शन फंड सीपीपीआयबी यांचीही हिस्सेदारी होती, जी त्यांनी विकली आहे.

Advertisement
Tags :

.