For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स 930 अंकांनी कोसळला

06:55 AM Oct 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुसऱ्या सत्रात सेन्सेक्स 930 अंकांनी कोसळला
Advertisement

विदेशी गुंतवणूकदारांच्या सततच्या विक्रीचा परिणाम

Advertisement

मुंबई :

चालू आठवड्यातील दुसऱ्या दिवशी मंगळवारी भारतीय शेअर बाजारात  सेन्सेक्स तब्बल 930 अंकांनी घसरला, तर निफ्टी 309 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांची सततची सुरु केलेली विक्री आणि या कारणास्तव सर्व क्षेत्रांमध्ये नकारात्मक स्थिती राहिली होती. याचा फटका हा  भारतीय शेअर बाजाराला बसल्याचे मंगळवारी दिसून आली असून भारतीय शेअर बाजारात गेल्या तीन आठवड्यांतील एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण राहिली आहे.

Advertisement

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर सेन्सेक्स 930.55 अंकांच्या तीव्र घसरणीसह निर्देशांक 1.15 टक्केसोबत 80,220.72 वर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी-50 देखील 309 अंकांच्या घसरणीसह 24,472.10 वर बंद झाला.

तीस कंपन्यांपैकी 28 कंपन्यांचे समभाग मंगळवारी घसरले. महिंद्रा अँड महिंद्राचा समभाग सुमारे 4 टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला. याशिवाय टाटा स्टील, पॉवरग्रीड, स्टेट बँक, टाटा मोटर्स, एनटीपीसी आणि मारुती यांचे शेअर्स प्रामुख्याने घसरले. दुसरीकडे, फक्त आयसीआयसीआय बँकेचे समभाग वधारुन बंद झाले आहेत. तर इतर सर्व समभाग घसरणीत राहिले.

बाजारातील घसरणीचे कारण?

परकीय गुंतवणूकदारांची बाजारातून मोठ्या प्रमाणावर माघार आणि जागतिक शेअर बाजारातील मंदी यामुळे बाजारात घसरण होत आहे. याशिवाय कंपन्यांच्या दुसऱ्या तिमाहीतील कमकुवत निकालांचाही बाजारातील भावावर परिणाम झाला आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणशास्त्रज्ञ डॉ. व्हीके विजयकुमार म्हणतात की एफआयआयद्वारे सतत विक्री केल्यानंतर सुधारणा झाली असली तरीही भारतीय बाजाराचे मूल्यांकन अजूनही उच्च आहे.

परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीचा मुद्दा एक्सचेंज डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी सोमवारी 2,261.83 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी 3,225.91 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 21 ऑक्टोबरपर्यंत भारतीय शेअर बाजारातून एकूण 82,845 कोटी रुपयांची विक्री केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी याच कालावधीत 74,176 कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. अशी माहिती एनएसडीएल डेटावरून प्राप्त झाली आहे.

स्मॉलकॅप शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. मंगळवारी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 2 टक्क्यांनी घसरला होता. ही घसरण विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) सतत केलेली विक्री आणि कमकुवत देशांतर्गत उत्पन्नामुळेही झाली आहे.

Advertisement
Tags :

.