For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ब्लादिमीर पुतीन 24 वर्षांनी उत्तर कोरिया दौऱ्यावर

06:18 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
ब्लादिमीर पुतीन 24 वर्षांनी उत्तर कोरिया दौऱ्यावर
Advertisement

किम जोंग उन यांची घेतली भेट  

Advertisement

वृत्तसंस्था/ प्योंगयांग

रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे मंगळवारी दोन दिवसीय दौऱ्यानिमित्त उत्तर कोरियात पोहोचले आहेत. 24 वर्षांमध्ये पुतीन यांचा हा पहिलाच उत्तर कोरिया दौरा आहे. पुतीन आणि किम यांच्यातील चर्चा सैन्य सहकार्य वाढविण्यावर आधारित असल्याचे समजते. दोन्ही देश अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वूमीवर स्वत:ची आघाडी मजबूत करू पाहत आहेत. किम यांच्या निमंत्रणानुसार पुतीन हे मंगळवारी आणि बुधवारी अधिकृत दौऱ्यावर असतील अशी माहिती उत्तर कोरियाच्या शासकीय वृत्तसंस्थने दिली आहे.

Advertisement

पुतीन यांचा हा दौरा शस्त्रास्त्र करारासंबंधी वाढत्या आंतरराष्ट्रीय चिंतांदरम्यान होत आहे. उत्तर कोरिया आर्थिक सहाय्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या बदल्यात रशियाला आवश्यक शस्त्रास्त्रs उपलब्ध करत आहे. या शस्त्रास्त्रांची रशियाला युक्रेनविरोधी युद्धाकरता मोठी आवश्यकता आहे. उत्तर कोरियाला आर्थिक सहाय्य आणि तंत्रज्ञान हस्तांतरण होत असल्याने किम जोंग उन यांच्या अण्वस्त्र तसेच क्षेपणास्त्र कार्यक्रमाला बळ मिळणार आहे. किम यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात रशियाचा दौरा केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील सैन्य, आर्थिक आणि अन्य सहकार्यात मोठी वाढ झाली आहे.

रशियाला शस्त्रास्त्रांचा पुरवठा

उत्तर कोरिया रशियाला दारूगोळा, क्षेपणास्त्रs आणि अन्य सैन्य उपकरणे उपलब्ध करत असल्याचा आरोप आहे. तर उत्तर कोरिया आणि रशियाने हा आरोप फेटाळला आहे. उत्तर कोरियासोबत शस्त्रास्त्रांचा करार करण्यावर संयुक्त राष्ट्रसंघानेच बंदी घातली आहे. दारूगोळा आणि कमी पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र उपलब्ध करण्याच्या बदल्यात रशियाकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रs मिळण्याची अपेक्षा उत्तर कोरियाला आहे. उत्तर कोरियाला स्वत:चे अत्याधुनिक सैन्य तंत्रज्ञान पुरविण्यास रशिया नाइच्छुक असला तरीही तो त्याच्याकडुन दारूगोळा मिळविण्यासाठी उत्सुक आहे.

Advertisement
Tags :

.