ब्लादिमीर पुतीनना एका गाण्याची धास्ती
रशियात कुठे गाणे वाजल्यास थेट होतोय तुरुंगवास : 18 वर्षीय डायना लोगिनोवाची सध्या जगभरात चर्चा
वृत्तसंस्था/मॉस्को
रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना निर्भय नेता म्हणून ओळखले जाते, पुतीन यांच्या कृत्याची धास्ती असल्यानेच जागतिक महासत्ता अमेरिका देखील रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणात थेट हस्तक्षेप करू शकला नाही. जागतिक स्तरावर दरारा निर्माण करणारे पुतीन आता एका गाण्याला घाबरून गेले आहेत. हे गाणे गाणाऱ्या युवतीलाच त्यांनी तुरुंगात डांबले आहे. 18 वर्षीय डायना लोगिनोवा हिला हेच गाणे गायल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे. तिला लेनिन्स्की न्यायालयासमोर हजर करण्यात आले. डायनाने एक सामूहिक सभा आयोजित करणे अािण त्याच्या परिणामादाखल सार्वजनिक व्यवस्थेचे उल्लंघन करण्याच्या आरोपाप्रकरणी यापूर्वीच 13 दिवसांचा तुरुंगवास भोगला आहे.
काय घडले होते सभेत?
ही सामूहिक सभा अचानक आयोजित करण्यात आलेला एकप्रकारचा स्ट्रीट कॉन्सर्ट होता, या सभेत सामील झालेल्या लोकांना रशियाचे अधिकारी विदेशी हस्तक ठरवून तुरुंगात डांबत आहेत. डायना लोगीनोवा संगीताची विद्यार्थिनी असून नाओको नावाच्या बँड स्टॉपटाइमची प्रमुख गायिका आहे. सेंट पीटर्सबर्गच्या रस्त्यांवर स्टॉपटाइम, नॉइज एमसी आणि मोनेटोचका या निर्वासित रशियन कलाकारांच्या गीतांचे सादरीकरण करत आहे, जे युक्रेनमधील रशियाच्या आक्रमणावर कठोर टीका करणारे गायक-गीतकार आहेत.
विदेशी हस्तकाची उपमा
स्टॉपटाइमच्या स्ट्रीट कॉन्सर्टमध्ये मोठी गर्दी होते, परंतु या बँडच्या अनेक संगीतकारांना विदेशात आश्रय घ्यावा लागला आहे. रशियात पुतीन विरोधी लोकांना अमेरिका किंवा युक्रेनचा हस्तक ठरवून शिक्षा दिली जात आहे. परंतु रशियात विदेशी हस्तकांचे गीत गाणे किंवा वाजविणे प्रतिबंधित नाही. मे महिन्यात रशियाच्या न्यायालयाने नॉइज एमसीच्या ट्रॅक स्वान लेक कोऑपरेटिव्हवर बंदी घालत यात घटनात्मक व्यवस्थेत हिंसक बदलाचा प्रचार सामील असल्याचा दावा केला.
बँडचे सदस्य तुरुंगात
स्वान लेकला अनेक लोक रशियात राजकीय परिवर्तनाचे प्रतीक म्हणून पाहतात. सोव्हियत महासंघात सोव्हियत नेत्यांच्या मृत्यूनंतर टीव्हीवर अनेकदा बॅले दाखविला जात होता आणि 1991 मध्ये कम्युनिस्ट कट्टरवाद्यांकडून अयशस्वी सत्तापालटाच्या प्रयत्नादरम्यान हे सोव्हियत टीव्ही स्क्रीनवर पुन्हा दाखविण्यात आले होते. लेक (रशियात ओजेरो) एक डाचा सहकाऱ्याचे नाव देखील आहे, जो पुतीन यांच्या निकटवर्तीयांशी व्यापक स्वरुपात जोडलेला आहे. स्टॉपटाइमकडून ही गीत सादर करण्याचा एक व्हिडिओ अलिकडेच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर डायनाला ताब्यात घेण्यात आले.
84 वर्षांच्या वयोवृद्धावरही दंड
84 वर्षीय लुडमिला वासिलीवा यांनाही सैन्याचा अपमान केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. लुडमिला यांचा जन्म हिटलरने सोव्हियत महासंघावर आक्रमण करण्याच्या दोन महिन्यांपूर्वी झाला होत्या. त्या लेनिनग्राडच्या नाझी वेढ्यातून त्या बचावल्या होत्या. जीवनभर त्या युद्ध किती विध्वंसक असू शकते हे जाणून होत्या.
काय आहे हे गाणे?
अलिकडेच न्यायालयात डायनावर रशियन सशस्त्र दलांना बदनाम करण्याचा आरोप जोडण्यात आला. हा आरोप तिच्याकडून गाण्यात आलेल्या गीताशी संबंधित आहे, मोनेटोचका (विदेशी हस्तक)चे गीत ’यू आर अ सोल्जर, यू आर अ सोल्जर’ गीतावरही रशियाच्या प्रशासनाचा तीव्र आक्षेप आहे.
लोक देत आहेत साथ : डायना
एका संक्षिप्त सुनावणीनंतर न्यायाधीशांनी डायनाला रशियन सैन्याची बदनामी केल्याप्रकरणी दोषी ठरवत 30 हजार रुबलचा दंड ठोठावला. तसेच तिच्या मुक्त संचारावर बंदी घालण्यात आली आहे. लोक आम्हाला साथ देत आहेत, याचा आनंद असल्याचे डायनाने तुरुंगात रवानगी होण्यापूर्वी म्हटले आहे.