विवोची एक्स 100 आवृत्ती लवकरच भारतीय बाजारात
नवी दिल्ली
चीनी टेक कंपनी विवो लवकरच येत्या 4 जानेवारी रोजी आपले विवो एक्स 100 हे मॉडेल भारतीय बाजारात सादर करणार आहे. या संदर्भात कंपनीने आपल्या वेबसाईटवर माहिती दिली आहे. मीडिया अहवालानुसार विवो एक्स 100 आवृत्तींमधील 2 स्मार्टफोन विवो एक्स 100 आणि विवो एक्स 100 प्रो हे दाखल होणार असल्याची माहिती आहे.
विवो मालिका स्मार्टफोन मीडिया टेक डायमेन्शन 9300 आणि विवो व्ही चिप 1 प्रोसेसरसह येणार आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 100 डब्लू फास्ट चार्चिंग सपोर्टसह 5400 एमएएच बॅटरी मिळणार आहे. याशिवाय, डिस्प्ले, रॅम, बॅटरी फ्रंट कॅमेरा आदी संदर्भात तपशील सादर होईल.
ओप्पो रेनो-11 11 जानेवारीला बाजारात
याचदरम्यान ओप्पो या कंपनीचा रेनो 11 हा स्मार्टफोन येत्या 11 जानेवारीला भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे. सदरच्या 11 सिरीजअंतर्गत कंपनीने गेल्या नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये स्मार्टफोन बाजारात सादर केले होते.
यांचे या सिरीजअंतर्गत दोन स्मार्टफोन्स भारतात लाँच केले जातील, अशी माहिती मिळते आहे. या फोनमध्ये 67 वॉटचा फास्ट चार्जरही मिळणार असल्याचे समजते. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 प्लस जन 1 प्रोसेसरही यात असेल.