विवोचा व्ही-60 लवकरच होणार लाँच
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय स्मार्टफोन बाजारात या महिन्यात विवोचा दमदार स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे. विवो आपला नवा स्मार्टफोन व्ही-60 येत्या 12 तारखेला भारतात लाँच करणार असल्याची माहिती मिळते आहे. 6500 एमएएच क्षमतेच्या दमदार बॅटरीसह आकारात सर्वात स्लीक फोन असणार आहे.
भारतीय बाजारात आपल्या नव्या स्मार्टफोन्सना आणण्याच्यादिशेने विवोने आपली रणनिती आखली आहे. येत्या 12 ऑगस्टला कंपनीचा नवा व्ही-60 हा स्मार्टफोन ग्राहकांसाठी दाखल होणार आहे. दुपारी 12 वाजता अधिकृतरित्या हा स्मार्टफोन लाँच केला जाणार असून फ्लीपकार्टवरही विक्रीसाठी उपलब्ध असेल. सदरचा फोन ऑस्पिशियस गोल्ड, मूनलिट ब्ल्यू आणि मिस्ट ग्रे या तीन रंगात दाखल होणार असून क्वाड कर्व्हड डिस्प्ले दिला जाईल. यात स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 प्रोसेसर असणार असून 12 जीबी रॅम व यात वाढीचा पर्याय असेल. फनटच ओएस 15 या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा हा फोन गुगल जेमिनी पर्यायासह येणार आहे. यात पुन्हा 50 मेगापिक्सलचा झीस सोनी कॅमेरा मेन सेन्सर, 50 मेगापिक्सलचा झीस सोनी टेलिफोटो लेन्स व 8 मेगापिक्सलचा झीस अल्ट्रावाइड अँगल लेन्सचा तसेच 50 एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे.