विवोचा टी-4 स्मार्टफोन लवकरच होणार लाँच
06:46 AM Mar 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
20 ते 25 हजार रुपये राहणार किमत
Advertisement
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनी मोबाईल कंपनी विवो आपला नवा स्मार्टफोन टी-4 लवकरच भारतात लाँच करणार आहे. या स्मार्टफोनला 5 हजार एमएएचची बॅटरी दिली जाणार आहे. अनेकविध वैशिष्ट्यांचा समावेश या फोनमध्ये असणार असल्याचे समजते.
Advertisement
टी-4 या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच क्षमतेची बॅटरी असणार असून 44 डब्ल्युचा फास्ट चार्जर असणार आहे. याच्या सोबतच आयक्युओओ यांनीही आपला नवा झेड-10 5जी स्मार्टफोन आणणार असल्याचे म्हटले असून त्यांच्या स्मार्टफोनमध्ये तर तब्बल 7300 एमएएचची बॅटरी असणार असल्याची माहिती आहे.
किती असणार किंमत
विवोच्या या टी-4 स्मार्टफोनला क्वॉलकॉम स्नॅपडॅगनची चिपसेट असेल.
या फोनची किंमत 20 ते 25 हजार रुपयांच्या घरामध्ये असणार असल्याची माहिती आहे.
सदरचा फोन कधी दाखल करणार आहे याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही.
Advertisement