विवो एक्स 200 स्मार्टफोन 12 डिसेंबरला होणार लाँच
50 मेगापिक्सलचा कॅमेरा : 6000 एमएएचची बॅटरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चिनी स्मार्टफोन कंपनी विवो यांनी आपला नवा विवो एक्स 200 सिरीज स्मार्टफोन येत्या 12 डिसेंबरला भारतात लाँच करण्याचे निश्चित केले आहे. सदरचा स्मार्टफोन मीडियाटेक डायमनसिटी 9400 उत्तम कॅमेऱ्यासह लाँच होणार आहे, अशी माहिती मिळते आहे.
कंपनी आपल्या स्मार्टफोनमध्ये जर्मन ऑप्टीक्स ब्रँड झीशीनीजचे तंत्रज्ञान वापरणार आहे. सदरचा स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये लाँच करण्यात आलेला आहे. विवो एक्स 200 सिरीजअंतर्गत कंपनी एक्स 200, एक्स 200 प्रो आणि एक्स 200 प्रो मिनी हे फोन्स सादर करणार आहे. 6.67 इंचाचा अमोलेड डिस्प्ले यात असणार असून 50 मेगापिक्सलचा सोनी एलवायटी 818 प्रायमरी सेन्सरसह कॅमेरा यात असेल. याशिवाय 50 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा देण्यात आलाय. एक्स 200 प्रोमध्ये मात्र 200 एमपीचा टेलिफोटो कॅमेरा दिला गेला आहे.
प्रोसेसर कोणता असणार
प्रो व एक्स 200 या मॉडेलना 32 एमपीचा फ्रंट फेसिंग कॅमेरा दिला असून एक्स 200 प्रोची बॅटरी 6000 एमएएच क्षमतेची, 90 डब्ल्यूचा चार्जर तसेच एक्स 200 ची बॅटरी 5800 एमएएच क्षमतेची व 90 डब्ल्यूचा चार्जर यात देण्यात आलाय. मीडियाटेक डायमनसिटी 9400 चा प्रोसेसर या फोनला असणार असून 12 जीबी रॅम, 16 जीबी रॅम व 256 जीबी, 1 टीबी स्टोरेजसह फोन येईल. अँड्रॉइड 15 वर आधारीत फनटच ओएस 15 या ऑपरेटिंग सिस्टमवर फोन चालणार आहे.
व्वन प्लस 13 लाँच होणार जानेवारीत
वन प्लस-13 स्मार्टफोन जागतिक स्तरावर तसेच भारतात एकाचवेळी लाँच केला जाणार असल्याची माहिती मिळते आहे. सदरचा वन प्लस 13 हा जानेवारी 2025 मध्ये लाँच होणार आहे. तारखेची घोषणा अद्याप करण्यात आलेली नसून या फोनची किंमत 70 हजार रुपयांच्या घरात असणार आहे. वन प्लस 12 ची किंमत 64,999 रुपये इतकी होती. हा फोन 6.82 इंचाच्या क्युएचडी प्लस डिस्प्लेसह येणार असून क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 इलाइटची चिपसेट यात असणार असून महत्त्वाचे म्हणजे 6000 एमएएचची बॅटरी यात असेल. 100 डब्ल्यूचा चार्जर देण्यात येणार आहे.