विवो एक्स 200 स्मार्टफोनची मालिका आज होणार सादर
झेडइआयएसएस तंत्रज्ञानासह क्वाड वक्र अमोलेड डिस्प्ले : भारतातील पहिला 200 एमपीचा टेलिफोटो कॅमेरा असल्याचा दावा
मुंबई :
दिग्गज टेक कंपनी विवो आज 12 डिसेंबर रोजी एक्स 200 या स्मार्टफोनची आवृत्ती सादर करणार आहे. कंपनी यामध्ये ‘एक्स 200’ आणि ‘एक्स 200 प्रो’ असे दोन स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती आहे. विवोने आपल्या वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टीझर सादर करुन लाँचची तारीख जाहीर केली आहे.
या मालिकेमध्ये पहिल्या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सल टेलिफोटो कॅमेरा मिळणार असून जो कंपनीने जर्मन ऑप्टिक्स ब्रँड झेडइआयएसएस सह विकसित केला आहे. कंपनीने म्हटले आहे, की यामध्ये मीडिया टेक डायमेशन 9400 प्रोससर असणार आहे जो फनटच ऑपरेटिंग सिस्टम 15 वर चालणार आहे. याशिवाय त्याला एक प्रगत विवो व्ही3 प्लस इमेजिंग प्रोसेसरदेखील मिळणार आहे. दोन्ही स्मार्टफोन्सना 5800, 6000 एमएएच क्षमतेच्या बॅटरी देण्यात आलेल्या आहेत. 90 डब्ल्युचा फास्ट चार्जरही दिला जाणार असल्याचे समजते. कॉसमॉस ब्लॅक आणि टिटॅनियम ग्रे या दोन रंगात हे फोन येणार आहेत.