ओप्पोचे रेनो 13, 13 प्रो पुढील वर्षी होणार लाँच
चिनी कंपनीची माहिती : जानेवारीत लाँच होणार
नवी दिल्ली :
ओप्पो या कंपनीने आपल्या नव्या रेनो 13 सिरीजअंतर्गतचे स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केली असून सदरचे नवे फोन पुढील वर्षी जानेवारीत बाजारात येतील. याअंतर्गत कंपनी रेनो 13 व रेनो 13 प्रो हे दोन स्मार्टफोन लाँच करेल. रेनो 13 प्रो हा ग्राफाइट ग्रे आणि मिस्ट लव्हेंडर या रंगात येणार असून रेनो 13 आयव्हरी व्हाइट व लुमिनीयस ब्ल्यू या रंगात येणार आहे. मॅटी व ग्लॉसी फिनीशसह हे फोन येणार असल्याने वेगवेगळ्या अँगलमधून फोनकडे पाहिल्यास रंग भिन्न दिसेल. रेनो 13ला अॅल्युमिनीयम फ्रेम असून कॉर्निंग गोरीला ग्लास 7आयचे संरक्षण याला असेल. रेनो 13 चे सादरीकरण पहिल्यांदा चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये केले गेले होते. यानंतर भारतीय या स्मार्टफोन्सची आतुरतेने वाट पाहात होते.
डिस्प्ले-6.83 इंचाचा अमोलेड, क्वॉड कर्व्हड डिस्प्ले
प्रोसेसर-मीडियाटेक डायमनसिटी 8350
रॅम- 16 जीबी एलपीडीडीआर5 एक्स पर्यंत
स्टोरेज-1 टीबी युएएफएस 3.1 पर्यंत
रिअर कॅमेरा- 50 एमपी प्रायमरी, 8 एमपी अल्ट्रावाइड, 50 एमपी टेलिफोटो
फ्रंट कॅमेरा- 50 एमपी, बॅटरी-5800 एमएएच
चार्जिंग- 80 डब्ल्यू वायर्ड, 50 डब्ल्यू वायरलेस
डिस्प्ले- 6.59 इंचाचा अमोलेड
प्रोसेसर- मीडियाटेक डायमनसिटी 8350
रॅम- 16जीबी एलपीडीडीआर5 एक्स पर्यंत
स्टोरेज- 1टीबीपर्यंत
रिअर कॅमेरा- 50 एमपी प्रायमरी, 8 एमपी अल्ट्रावाइड, चार्जिंग- 80 डब्ल्यू वायर्ड
फ्रंट कॅमेरा- 50 एमपी, बॅटरी- 5600 एमएएच