विवो व्ही 60 भारतीय बाजारात दाखल
07:00 AM Aug 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
किंमत 36,999 रुपये : 50 एमपी कॅमेऱ्यांसह 6500 एमएएच बॅटरी
Advertisement
नवी दिल्ली : विवोने भारतीय बाजारात नवीन व्ही आवृत्तीचा विवो वी60 हा 5 जी मध्ये सादर केला आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत ही 36,999 रुपये आहे. हा कॅमेरा केंद्रीत स्मार्टफोन आहे. लग्नाची फोटोग्राफी, पोट्रेट आणि झेइआयएसएस इंटिग्रेटेड फिचर्ससोबत हा स्मार्टफोन येणार आहे. वरील सुविधांसोबतच एआय पॉवर्ड फिचर्सही राहणार आहेत. यासह नवीन स्नॅपड्रॅगन 7 जनरेशन 4 प्रोसेसरसह शक्तीशाली कामगिरी करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
अत्याधुनिक फिचर्स :
Advertisement
- विवो वी 60 हा 5 जीमध्ये येत असून डिझाईन आकर्षक व हलका राहणार
- 6.77 इंचाचा क्वाड कर्व्हड डिस्प्ले असून याचा रिफ्रेश रेट 120 एचझेड आहे.
- पीक ब्राइटनेस 5000 निट्स पर्यंत आहे.
- स्मार्टफोन आता पाणी आणि धूळ यापासून संरक्षण करणार आहे.
- 6500 एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे.
Advertisement