विवोचा टी 4 अल्ट्रा स्मार्टफोन लाँच
38 हजार किमत : अनेक वैशिष्ठ्यांचा समावेश : 50 मेगापिक्सलचा कॅमेरा
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
चीनी स्मार्टफोन मोबाइल कंपनी विवो यांनी आपला टी 4 अल्ट्रा हा स्मार्टफोन नुकताच भारतामध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 38 हजार रुपयांच्या घरामध्ये असणार असून याला 6.67 इंचाचा क्वाड कर्व्हड अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. मीडियाटेक डायमन सिटी 9300 प्लस प्रोसेसरने युक्त असा स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसोबत उपलब्ध होणार आहे. यासोबतच 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 40 हजार रुपये असणार आहे. तर 12 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनची किंमत 42 हजार रुपयांच्या घरात असणार आहे. विवोचा हा स्मार्टफोन 18 जूनपासून कंपनीच्या इ-स्टोर वरती त्याचप्रमाणे कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल आउटलेट्सवर विक्री करता उपलब्ध होणार आहे.
सवलत आणि कॅमेरा
कंपनीने फोन खरेदीकरीता सवलतही जाहीर केलीय. सुरुवातीला खरेदी करणाऱ्या निवडक ग्राहकांना निवडक कार्डवरती 3 हजार रुपयांची सवलत या स्मार्टफोनवर मिळणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. विवो टी 4 अल्ट्रा हा 6.67 इंचाच्या क्वाड कर्व्हड अमोलेड डिस्प्लेसह येणार असून रिफ्रेश रेट 120 हर्टझ इतका असेल. यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सोनीचा कॅमेरा देण्यात आला असून 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइल्ड अँगलचा लेन्सही यामध्ये असेल.
हेही वैशिष्ट्या...
आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे 50 मेगापिक्सलचा पेरिस्कोपिक टेली फोटो कॅमेरा असून थ्री एक्स झूम ऑप्टिकलची सोय यामध्ये असेल. फोनला 5500 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून 90 डब्ल्यूचा वायर चार्जरही दिला जाणार आहे. अँड्रॉइड 15 वर फोन चालणार असून आर्टिफिशल इंटेलिजेन्सची वैशिष्ट्यो देखील यामध्ये समाविष्ट असणार आहेत.