‘विवो टी3’ स्मार्टफोन भारतात लाँच
07:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
6.67 इंचाचा डिस्प्ले : 50 एमपी कॅमेरा
Advertisement
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
चिनी टेक कंपनी विवोने गुरुवारी टी आवृत्तीच्या स्मार्टफोनचे बाजारात सादरीकरण केले आहे. यामध्ये विवो टी3 हा 5 जी मध्ये सादर केला आहे. हा स्मार्टफोन दोन मॉडेलमध्ये बाजारात आणला आहे. यामध्ये 8जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज मॉडेल असणाऱ्या फोनची किंमत ही 19,999 रुपये आहे. यासह अन्य मॉडेल हे 21,999 रुपये किमतीला मिळणार असल्याची माहिती आहे. फोटोग्राफीसाठी, फोनच्या मागील पॅनेलमध्ये 50 एमपी प्राथमिक कॅमेऱ्यासह 2 एमपी दुय्यम कॅमेरा आहे. दरम्यान कार्यक्षमतेसाठी फोनमध्ये मीडियाटेक डायमेंशन 7200 प्रोसेसर आहे. या सेंगमेंटमधील सर्वात वेगवान स्मार्टफोन राहणार असल्याची माहिती आहे.
Advertisement
अन्य फिचर्स :
- डिस्प्ले : विवो टी3 स्मार्टफोनमध्ये 120एचझेड रिफ्रेश रेटसह 6.67 इंच एफएचडी अमोलेड डिस्प्ले
- कॅमेरा : सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी पंच होल डिझाईनमध्ये 16 एमपीचा कॅमेरा दिला आहे
- बॅटरी/चार्जिंग : यामध्ये 44 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएच बॅटरीची सुविधा उपलब्ध
- अन्य सुविधा : कनेक्टिव्हीटीसाठी फोनमध्ये 5जी, 4जी, 3जी, 2जी, वायफाय ब्लूट्यूथ 5.3, जीपीएस आणि युएसबी टाईप सी पोर्ट राहणार.
Advertisement