For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिअलमी नार्झो 70 स्मार्टफोन बाजारात लाँच

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
रिअलमी नार्झो 70 स्मार्टफोन बाजारात लाँच
Advertisement

कोलकाता : रिअलमी या कंपनीने आपले दोन स्मार्टफोन बुधवारी भारतीय बाजारात सादर केले आहेत. नार्झो 70 एक्स 5जी व नार्झो 70 प्रो 5जी हे दोन फोन कंपनीने मीडियाटेक डायमेंन्शन चिपसेटसह सादर केले आहेत. 45 वॉटच्या फास्ट चार्जरसह या स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएचची बॅटरी दिली आहे. नार्झो 70 5जी किंमत 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह 14,999 रुपये तर 8 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 15,999 रुपये असणार आहे. नार्झो 70 एक्स 5जीची किंमत 4 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेजसह 10999 रुपये व 6 जीबी व 128 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 11999 रुपये इतकी असणार आहे. या फोनला 6.72 इंचाचा फुल्ल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले असणार असून यात ड्युअल कॅमेऱ्याची सोय आहे.एक 50 मेगापिक्सलचा तर दुसरा 2 मेगापिक्सलचा शूटर कॅमेरा असणार आहे. फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सलचा दिला गेला आहे.

Advertisement

वैशिष्ठ्यो....

  • किंमत : 10 हजार ते 16 हजार रुपयांच्या घरात
  • बॅटरी : 5000 एमएएच क्षमतेची
  • चार्जर: 45 वॉटचा दमदार चार्जर
  • कॅमेरा: 50 मेगापिक्सलचा उत्तम कॅमेरा
Advertisement
Advertisement
Tags :

.