पहिल्याच दिवशी विठुमाऊलीचे दर्शन बुकींग हाऊसफुल्ल
मंदिर प्रशासनाला तीन महिन्यात दिड कोटीहुन अधिक उत्पन्न
पंढरपूर
पंढरपूरच्या विठुरायाच्या भाविकांना घरबसल्या विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेचे बुकींग करता यावेळी, यासाठी मंदिर समितीतर्फे २६ डिसेंबरपासून ऑनलाईन बुकींगला सुरुवात करण्यात आली. यावेळी १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीतील विठुरायाच्य पुजेचे ऑनलाईन बुकींग सुरू होते. तर या तीन महिन्याच्या कालावधीतील बुकींग पहिल्याच दिवशी बुक्ड झाले. आता भाविकांना नित्यपूजा सेवेसाठी पुढच्या तीन महिन्यांची वाट पाहावी लागणार.
विठुराया दररोज सकाळी महापूजा केली जाते. या पूजेचे आकर्षण सर्वच भाविकांना आहे. या महापूजेच्या बुकींगसाठी ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली होती. विठुरायाच्या नित्य पुजेसाठी २५००० तर रुक्मिणी मातेच्या नित्य पूजेसाठी ११००० एवढे शुल्क ठरविण्यात आले होते. ऑनलाईन बुकींग सुरु होताच, पहिल्याच दिवशी तीन महिन्यांच्या पूजेचे बुकींग झाले. या नित्यपूजेच्या सेवेतून मंदिर प्रशासानाला ५५ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. याशिवाय पाद्यपूजा तुळशी आरक्षण पूजा यासाठीचे बुकींग झालेले आहे. यामध्ये पाद्यपूजा व तुळशी अडचण पूजेच्या काही पूजा शिल्लक आहेत. भाविकांना याचे घर बसल्या बुकींग करता येणार आहे.
मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दार चांदीने मढविण्याचे काम सुरू
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम सुरू आहे. याअंतर्गत मंदिर समितीच्या बैठकीत संत नामदेव पायरीवरील पितळी दरवाजा चांदीचा बनविण्याचा ठराव करण्यात आला होता. नांदेड येथील अरगुलकर परिवारातर्फे हा चांदीचा दरवाजा बसवून देण्यात येणार आहे. यासाठी तीस किलो चांदी लागणार आहे. साधारण तीस लाख रुपये खर्च येणार आहे. दिगंबर तुकाराम अरगुलकर आणि जनाबाई अरगुलकर यांच्या स्मरणार्थ नरसिमलू बंधु यांच्याकडून हा चांदीचा दरवाजा केला आहे. यानुसार मागील आठ दिवासांपासून हे काम सूरू आहे. या कामानिमित्त या पितळी दरवाजातून भाविकांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात या मंदिराच्या या चांदीच्या दरवाजाचे काम पूर्ण होईल.