Tulja Bhavani Temple | श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर हल्ला; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
तुळजापूर मंदिर परिसरात तणावाचे वातावरण
तुळजापूर : तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर महाद्वार समोर किरकोळ विक्रेते, फेरीवाले, दोऱ्या विकणारे काठीवाले आणि बांगड्या विकणाऱ्या महिलांनी हातातील कडे घेण्याच्या किरकोळ कारणावरून मंदिर महाद्वार समोर मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी आठच्या सुमारास घडल्याने पुन्हा भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे समोर आले आहे.
इचलकरंजी येथील भाविक हर्षद रमेश गडदे, सारिका बसाप्पा तोडगी आणि बेळगाव येथील सुरेखा रमेश गडदे यांच्यासह दहा-बारा भाविकांच्या घोळक्यांनी मंदिर महाद्वार समोर अनोष अनिल धाबारे (रा. तुळजापूर)यांनी मंदिर पोलीस चौकीत एकमेकांविरुद्ध तक्रार दिली आहे.
घटनेनंतर मंदिर पोलीस चौकीसमोर अर्धा पाऊण तास चांगलाच गोंधळाचा राडा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. तणावाचे वातावरण हाताबाहेर गेल्याने मंदिर पोलीस कर्मचारी आकाश सुरनर यांनी पोलीस गाडी मागून भाविकांसह दौरेवाले व्यापारी आणि बांगड्या बाल्या महिलांना तुळजापूर पोलीस चौकीकडे पाठवले.