आयटीसीच्या समभागांची दोन दिवसात 10 टक्क्यांवर झेप
सर्वाधिक उच्चांकांसह 500 रुपयांचा टप्पा प्राप्त
नवी दिल्ली :
बाजारातील जलद गतीने चालणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू आणि हॉटेल क्षेत्रातील दिग्गज कंपनी आयटीसीचे समभाग हे मागील दोन दिवसांमध्ये सुमारे 10 टक्क्यांनी वाढले आहेत. बीसएसईवर बुधवारच्या सत्रात आयटीसीच्या समभागांनी 500 रुपयांचा टप्पा ओलांडून 510.60 रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला.
2024 च्या अर्थसंकल्पात, सरकारने सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवरील विद्यमान कर दरात वाढ केली नाही. त्यानंतर मंगळवारच्या सत्रात आयटीसीचे समभाग 5 टक्क्यांनी वाढले.
तंबाखूवर कर लावण्याची जबाबदारी जीएसटी कौन्सिलच्या कक्षेत येते. त्याच वेळी, केंद्र सरकार सिगारेटवर राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक शुल्क (एनसीसीडी) लादते, जे बजेटमध्ये समायोजित केले जाते.
कर वाढले असते तर?
आयटीसीसाठी, कंपनीच्या निव्वळ नफ्यात सिगारेटचा वाटा 80 टक्क्यांहून अधिक आणि महसुलात सुमारे 45 टक्के आहे. जे दर्शविते की तंबाखूच्या कर दरात काही बदल झाल्यास त्याचा कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर लक्षणीय परिणाम होतो.
मोतीलाल ओसवाल काय म्हणाले
ब्रोकरेज कंपनी मोतीलाल ओसवाल यांनी सांगितले की आयटीसीच्या सिगारेट व्यवसायात आर्थिक वर्ष 2023 आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये सुधारणा झाली आहे.