For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वृद्धत्व रोखण्यास मदत करते व्हिटॅमिन डी

06:39 AM Sep 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
वृद्धत्व रोखण्यास मदत करते व्हिटॅमिन डी
Advertisement

अमेरिकेतील अध्ययनात खुलासा

Advertisement

व्हिटॅमिन डी माणसाला दीर्घकाळापर्यंत तंदुरुस्त आणि तरुण ठेवू शकतात असे एका नव्या अध्ययनात दिसून आले आहे. व्हिटॅमिन डी मानवी डीएनएचे रक्षण करणाऱ्या टेलोमियर्सला वाचवितात, जे वृद्धत्वाशी निगडित आजार रोखण्यास मदत करतात.

व्हिटॅमिन डीला सनशाइन व्हिटॅमिन देखील म्हटले जाते, हे आमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे. यामुळे हाडांना मजबुती मिळते. इम्युन सिस्टीमला बळ मिळते. परंतु नव्या अध्ययनानुसार व्हिटॅमिन डी वृद्धत्वाचा वेग मंद करू शकते. आमच्या शरीरात 46 क्रोमोसोम्स असतात, ज्यांच्या शिरावर टेलोमियर्स नावाच्या छोट्या संरचना असतात, हे टेलोमियर्स डीएनएला नुकसानापासून वाचवितात.

Advertisement

 

दरवेळी जेव्हा आमच्या पेशी विभाजन करतात, तेव्हा टेलोमियर्स काहीसे छोटे होत जातात, जेव्हा हे अत्यंत छोटे होतात, तेव्हा पेशी मरू लागतात, ज्यामुळे कॅन्सर, हृदयरोग आणि वयोमानाशी निगडित अन्य आजार वाढू शकतात. धूम्रपान, तणाव आणि सूज टेलोमियर्सला आणखी वेगाने छोटे करतात, परंतु व्हिटॅमिन डी टेलोमियर्सला वाचविण्यास मदत करतात, यामुळे पेशी दीर्घकाळापर्यंत स्वस्थ राहतात.

अध्ययनात काय आढळले?

ऑगस्टा युनिव्हर्सिटीतील एका अध्ययनात 1031 लोकांना सामील करण्यात आले, या लोकांचे वय सरासरी 65 वर्षे होते. या लोकांवर 5 वर्षांपर्यंत अध्ययन करण्यात आले. निम्म्या लोकांना दररोज 2000 आययू (इंटरनॅशनल यूनिट) व्हिटॅमिन डीची गोळी देण्यात आली, उर्वरितांना प्लेसिबो (औषध नसलेली गोळी) देण्यात आली. संशोधकांनी त्यांच्या टेलोमियर्सना दोन वर्षांनी आणि चार वर्षांनी मोजले आहे. याचे निष्कर्ष चकित करणारे होते, ज्या लोकांनी व्हिटॅमिन डी घेतले होते, त्यांचे टेलोमियर्स 140 बेस पेयर्स अधिक वाचलेले, तर प्लेसिबो ग्रूपमध्ये असे घडले नाही. साधारणपणे टेलोमियर्स 10 वर्षांमध्ये 460 बेस पेयर्स छोटे होतात, याचा अर्थ व्हिटॅमिन डी वृद्धत्वाचा वेग कमी करण्यास मदत करू शकते. पूर्वीच्या अध्ययनातही हे दिसून आले होते. मेडिटेरेनियन डायट जो सूज कीम करणाऱ्या पोषक घटकांनी युक्त आहे, तो देखील टेलोमियर्सला मोठे ठेवण्यास मदत करतो.

व्हिटॅमिन डीचे लाभ

व्हिटॅमिन डी कॅल्शियमला अवशोषित करण्यास मदत करतो. मुले, किशोरवयीन आणि दाट रंगाची त्वचा असलेल्या लोकांना व्हिटॅमिन डीची अत्यंत आवश्यकता असते. हे आमच्या इम्युन सिस्टीमला मजबूत करते. रुमेटाइड, ल्यूपस आणि मल्टीपल स्क्लेरोसिस यासारख्या ऑटोइम्यून आजारांना हे रोखू शकते असे काही प्रारंभिक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. अत्यंत लांब टेलोमियर्स देखील धोका वाढवू शकतात. टेलोमियर्सच्या लांबीचे योग्य संतुलन असणे आवश्यक असल्याचे काही वैज्ञानिकांचे सांगणे आहे.

Advertisement
Tags :

.