महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विटा नगरपरिषदचे पुन्हा एकदा लौकिक! मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेमध्ये विभागात तिसरी

01:59 PM Jan 17, 2024 IST | Abhijeet Khandekar
Vita Municipal Council
Advertisement

नगरीच्या नावलौकिकात भर : मिळवले 1 कोटीचे बक्षीस

विटा प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेत विटा नगरपरिषदेने अ व ब नगरपरिषद वर्गवारी मध्ये विभागस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. नगरपालिकेला एक कोटीचे बक्षीस मिळणार आहे. यामुळे विटा शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

Advertisement

स्वच्छ भारत अभियान मधील स्वच्छ सर्वेक्षण 2023 मधील भरघोस यशा नंतर पुन्हा एकदा विटानगर परिषदेने बाजी मारली आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने चालू वर्षी मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धा विभागस्तरीय व राज्यस्तरीय अशा दोन प्रकारे घेण्यात आली होती. यामधील विभाग स्तरीय स्पर्धेच्या निकषानुसार विटा नगरपरिषदेने अ व ब नगरपरिषद वर्गवारी मध्ये विभागस्तरीय तृतीय क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवून एक कोटीचे बक्षीस प्राप्त केले आहे.

Advertisement

विटा नगरीच्या नावलौकिका मध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे. स्वच्छ सर्वेक्षण मधील भरघोस यशा नंतर मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धामधील विटा शहाराचे यश कौतुकास्पद आहे. मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा 2023 मध्ये पुणे विभागामधील अ व ब नगरपरिषदांमध्ये तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल विभागीय आयुक्त पुणे विभाग यांच्या वतीने देखील नगर परिषदेचे अभिनंदन करण्यात आले. आपले विटा शहर विकासाप्रतीची बांधिलकी बाळगून आहे तसेच सक्षम शहर बनविणे करता विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विटा शहराचा विकास करण्याकरता कायमच अग्रेसर असते. सदर स्पर्धेमधील उल्लेखनीय कामगिरी व मिळालेले यश हे आपल्या सर्व विटा नगरवासीयांचे आहे.
यावेळी मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेतील मूल्यांकन व निकष याप्रमाणे काम करणे करता सर्व नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे योगदान मोलाचे आहे असे सांगत मुख्याधिकारी श्री विक्रमसिंह पाटील व उपमुख्याधिकारी श्री.स्वप्निल खामकर यांनी सर्वांचे कौतुक केले.

Advertisement
Next Article