केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या दौरा! कोल्हापूरातील वाहतुक मार्गात बद्दल
कोल्हापूर प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 सप्टेंबर रोजी अमित शहा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दौऱ्यानिमित्याने शहरातील काही वाहतुक मार्गात बद्दल करण्यात आला आहे.
बदल करण्यात आलेला एकेरी मार्ग - दुर्गा चौक ते खानसो पुतळा हा चारचाकी वाहनासाठी एकेरी असणारा मार्ग केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्या कॉनव्हॉय वाहनासाठी येण्या-जाण्यापुरता शिथील करण्यात आला आहे. मिरजकर तिकटी ते अंबाबाई मंदिर हा एकेरी मार्ग देखील कॉनव्हॉय वाहनासाठी येण्या-जाण्यापुरते शिथील करण्यात आला आहे. तसेच बिनखांबी गणेश मंदिर ते खरी कॉर्नर ते दैवज्ञ बोडींग मार्गे मिरजकर तिकटी हा एकेरी सुध्दा कॉनव्हॉय वाहनासाठी येण्या-जाण्यापुरता शिथील करण्यात आला आहे.
बंद करण्यात आलेला मार्ग- धैर्यप्रसाद चौक ते महासैनिक दरबार हॉल ते लाईन बाजार चौक हा रस्ता सर्व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
नो पार्किंग झोन - विमानतळ ते शाहु टोल नाका, शाहु टोल नाका ते हायवे कॅन्टीन, हायवे कॅन्टीन ते कोयास्को चौक ते ताराराणी चौक, ताराराणी चौक ते धैर्यप्रसाद चौक ते महासैनिक दरबार हॉल, धैर्यप्रसाद चौक ते खानविलकर पेट्रोल पंप, खानविलकर पेट्रोल पंप ते दसरा चौक मार्गे बिंदु चौक, बिंदू चौक ते श्री अंबाबाई या मार्गावर दुतर्फा खासगी वाहने (दुचाकी आणि चारचाकी) पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे.