महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नौदल दिन कार्यक्रमाच्या तयारीची सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

12:54 PM Nov 17, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

नौसेना प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मालवणला भेट

Advertisement

मालवण (प्रतिनिधी)

Advertisement

डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नौदल दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवणात येणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमुळे तसेच राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उदघाटन आणि तद अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी नौसेनेसह प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मालवणात रेलचेल वाढली असून आज नौसेनेचे पश्चिम विभाग प्रमुख रिअर ऍडमिरल दिनेश त्रिपाठी तसेच महसूलचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणपूरकर व कोकण परीक्षेत्र विशेष पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांनी राजकोट किल्ल्यातील कामाची पाहणी करून सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बोर्डिंग ग्राउंड, तारकर्ली येथे भेट देऊन नौदल दिन कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.

भारतीय नौसेनेचा यंदाचा नौदल दिन मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यात साजरा होणार आहे. यानिमित्त राजकोट किल्ला येथे नौसेनेकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणी व तटबंदी उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. नौदल दिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजन व तयारीसाठी तसेच शिवपुतळा उभारणी कामाचा आढावा घेण्यासाठी नौसेना अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांची सातत्याने मालवणात रेलचेल सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी नौसेनेचे पश्चिम विभाग प्रमुख रिअर ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी अन्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत राजकोट किल्ला येथे शिवपुतळा व तटबंदी उभारणीच्या कामाची पाहणी करत आढावा घेतला. हे काम २५ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी त्रिपाठी यांनी दिल्या.

तसेच सायंकाळी महसूलचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणपूरकर व कोकण परीक्षेत्र विशेष पोलीस महासंचालक प्रवीण पवार यांनी मालवणात भेट दिली. यावेळी राजकोट किल्ल्यातील कामाची पाहणी करून सिंधुदुर्ग किल्ला, मालवण बोर्डिंग, तारकर्ली येथेही भेट देऊन नौसेना कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. नौदल दिनाच्या अनुषंगाने मालवणात सुरु असलेली सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत अशी सूचना यावेळी या अधिकाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अग्रवाल ,प्रांताधिकारी कळुसे, तहसीलदार वर्षा झाल्टे यासह इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news# malvan # breaking #
Next Article