For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरोधकांकडून यंत्रणेचा गैरवापर...इव्हीएम मशीनच्या जागा बदलल्या; उमेदवार विशाल पाटील यांचा आरोप

10:36 AM May 07, 2024 IST | Abhijeet Khandekar
विरोधकांकडून यंत्रणेचा गैरवापर   इव्हीएम मशीनच्या जागा बदलल्या  उमेदवार विशाल पाटील यांचा आरोप
Vishal Patil Sangli
Advertisement

सांगली प्रतिनिधी

निवडणूक अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणामध्ये सूचना दिल्या असताना सुद्धा जाणून बुजून दुसऱ्या क्रमांकाचे ईव्हीएम मशीन डाव्या बाजूला पहिल्या क्रमांकाला ठेवल्याचे प्रकार काही ठिकाणी झाले असून विरोधकांकडून शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे असा आरोप सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केला आहे.

Advertisement

मिरज तालुक्यातील पदमाळ येथे सपत्नीक मताधिकार बजावल्यानंतर विशाल पाटील यांनी विविध मतदान केंद्रावर भेटी देण्यास सुरुवात केली असून या दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी ईव्हीएम मशीन चुकीच्या जागी ठेवण्याबरोबरच मतदान केंद्राबाहेर लावलेल्या उमेदवारांच्या माहितीतून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोप केला आहे. याबाबत आपण जिथे भेट दिली तेथील मतदान केंद्रावर बदल करण्यास लावले असल्याचेही विशाल पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

Advertisement
Advertisement
Tags :

.