महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्हिसामुक्त प्रवेश..विदेशी पर्यटनाला बहर...

06:31 AM Dec 02, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीयांना परदेशात प्रवास करणे जास्त आवडते. या तुलनेने पाहता आता भारतीयांना मलेशियातही व्हिसाशिवाय प्रवास करता येणार आहे. थायलंड आणि श्रीलंका या देशांनी अलीकडेच भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यासंबंधीची सवलत जाहीर केली आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जागतिक स्तरावरील पासपोर्ट निर्देशांकामध्ये भारताचा क्रमांक 137 वा आहे. भारतीयांना जर का विदेशात जायचे असेल तर 123 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळत नाही. भारतीयांना 23 देशांना व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. आता अलीकडेच भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश देण्यासाठी तीन देश पुढे आले आहेत. म्हणजेच आता 26 देशांमध्ये भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवेश मिळवता येणार आहे. यायोगे भारतीय पर्यटक आगामी काळामध्ये तीन देशांना मोठ्या प्रमाणामध्ये भेट देतील, असे सांगितले जात आहे. भारतीयांना अंगोला, बारबाडोस, भूतान, डोमिनिका, एल  साल्वाडोर, फिजी, गॅबॉन, गांबिया, ग्रेनाडा, हैती, जमैका, कझाकस्तान, किरीबती, मकाऊ, मॉरिशियस, मायक्रोनेशिया, नेपाळ, पॅलेस्टेनियन प्रदेश, सेंट किट्स आणि नेवीस, सेनेगल, सेंट विन्सेंट, ग्रेनाडाइन्स, त्रिनिनाद व टोबॅगो तसेच वनौतु,  श्रीलंका, थायलंड आणि मलेशिया या देशांना व्हिसाशिवाय पर्यटनासाठी जायला भारतीयांना मुभा देण्यात आली आहे. अर्थात सदरची मुभा तीस दिवसांकरिताच असणार असल्याची माहिती आहे. मलेशियाने 1 डिसेंबरपासून तीस दिवसांकरिता भारतीय आणि चीनी नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश जाहीर केला आहे. अलीकडच्या आठवड्यांमध्ये थायलंड आणि श्रीलंका यांनीही अशाच प्रकारची घोषणा केली होती. सदर तिन्ही देशांचा व्हिसामुक्त प्रवेश देण्याचा उद्देश हा पर्यटन वाढीसाठी असेल. व्यवसाय, सामाजिक भेट व पर्यटनासाठी म्हणून भारतीयांना या देशांमध्ये भेट देता येणार आहे. मलेशियामध्ये भेट देणाऱ्या एकंदर पर्यटकांमध्ये भारतीयांची संख्या मोठी असल्याची बाब दिसून आली आहे. श्रीलंकेने भारतीयांसह चीन, रशिया, मलेशिया, जपान, इंडोनेशिया आणि थायलंड या सहा देशातील नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेश जाहीर केला आहे. 31 मार्च 2024 पर्यंत या देशामध्ये विदेशी पर्यटकांना भेट देता येणार आहे. श्रीलंकेतील पर्यटन मंत्रालयाला येत्या काळामध्ये 50 लाखापेक्षा जास्त पर्यटक भेट देण्याची शक्यता आहे. थायलंडनेसुद्धा भारतीय आणि तैवानी लोकांसाठी व्हिसामुक्त प्रवेश जाहीर केला आहे, जो 30 दिवसांसाठी असणार आहे. विदेशी पर्यटन बहरणार हे नक्की.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article