For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विरियातो यांना तिकीट देण्यास सहा महिन्यांपूर्वीच सूचवले होते

12:20 PM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
विरियातो यांना तिकीट देण्यास सहा महिन्यांपूर्वीच सूचवले होते
Advertisement

गोवा फॉरवर्ड अध्यक्ष विजय सरदेसाई यांची बाणावलीतील बैठकीत माहिती

Advertisement

मडगाव : दक्षिण गोव्यात कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना तिकीट द्या, असे आपण काँग्रेस हायकमांडला सहा महिन्यांपूर्वीच सांगितले होते, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष असलेले फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी बाणावली येथील ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत बोलताना सांगितले. जात, पंथ किंवा धर्माचा विचार न करता कॅप्टन विरियातो यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सरदेसाई हे मागील पंधरवड्यात युरोप वारीवर होते. दोन दिवसांपूर्वी ते गोव्यात परतले आहेत. त्यानंतर त्यांनी दक्षिण गोव्यातील ‘इंडिया’ आघाडीच्या बाणावलीतील सभेला उपस्थिती लावली. आपला गोवा फॉरवर्ड पक्ष उत्तर गोव्यात रमाकांत खलप यांना पूर्ण पाठिंबा देईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी सरदेसाई यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. आमचे मत हे पवित्र असून प्रत्येकाने मरदानाचा हक्क बजवायला हवा. पैशांचे आमिष दाखविले म्हणून मत विकणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले. कॅप्टन विरियातो यांनी देशासाठी केलेले कार्य आम्हाला महीत आहेच. परंतु ते एक कार्यकर्ते म्हणून पुढे आले आणि राजकारणी झाले. एखाद्या व्यक्तीतील कार्यकर्ता कधीही मिटत नसतो. त्यामुळेच अशा कार्यकर्त्याला संसदेत पाठवावे, अशी हाक सरदेसाई यांनी दिली.

Advertisement
Advertisement
Tags :

.