वीरेंद्र सेहवाग घेणार पत्नीसोबत ग्रे डिव्होर्स
दिल्ली : क्रिकेट विश्वातील खेळाडूंचे आयुष्य नेहमीच चर्चे त असतं. अलिकडेच भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांच्या घटस्फोटाची चर्चा जोरदार सुरू आहे. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग त्यांच्या पत्नीसोबत ग्रे डिव्होर्स घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. वीरेंद्र सेहवाग आणि आरती या दोघांनी २००४ मध्ये लग्न केले. त्यांच्या लग्नाला २० वर्ष पूर्ण झाली आहेत. वीरेंद्र सेहवाग यांना त्यांच्या पत्नी वयाच्या ७ व्या वर्षीत आवडली होती. या दोघांनी एकमेकांना १४ वर्ष डेट केले. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्ण घेतला. या निर्णयाबद्दल घरच्यांना माहिती नव्हती. या दोघांनी जेव्हा घरच्यांना सांगितले, तेव्हा घरच्यांनी लग्नाला विरोध केला होता. वीरेंद्र सेहवाग आणि आरती यांना दोन मुले आहेत.
ग्रे डिव्होर्स म्हणजे काय ?
जेव्हा एखादे जोडपे १५ वर्ष किंवा त्याहून अधिक काळासाठी एकत्र संसार करतात. पण त्यांना काही कारणानास्तव घटस्फोट घ्यायचा असेल तर त्याला ग्रे डिव्होर्स म्हणतात़. या घटस्फोटाद्वारे वेगळ्या होणाऱ्या दोन्ही व्यक्ती ह्या ५० वर्षांच्या आसपास असतात, किंवा त्याहून अधिक वयाच्या असतात. या विभक्त होण्याच्या प्रक्रियेला लेट लाईट डिव्होर्स किंवा डायमंड डिव्होर्स असेही संबोधले जाते. सध्या ग्रे डिव्होर्सचे प्रमाण एकूण २३ टक्क्यांनी वाढले आहे.