कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विराट कोहली नाबाद 37

06:51 AM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

भारताचा भरवशाचा आणि आक्रमक फलंदाज विराट कोहलीने बुधवारी 37 व्या वर्षात पदार्पण केले. विराटचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. विराटने आपल्या 17 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय विक्रम केले आहेत. जगातील असंख्य चाहत्यांनी विराटला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

Advertisement

विराटने 123 कसोटी सामन्यात 46.85 धावांच्या सरासरीने 9230 धावा जमविल्या असून त्यामध्ये 30 शतके व 31 अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटी क्रिकेटमध्ये नाबाद 254 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. विराटने यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. आता कसोटी क्रिकेटमदये सर्वाधिक धावा जमविणारा तो चौथा भारतीय फलंदाज आहे. विराटने 2016 ते 2019 या कालावधीत झालेल्या 43 कसोटी सामन्यात 66.79 धावांच्या सरासरीने 4208 धावा जमविताना 16 शतके आणि 10 अर्धशतके नोंदविली आहेत. तसेच त्याने कसाटीत 7 द्विशतके आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतके झळकविणारा कर्णधार या नात्याने विराटचा हा विक्रम आहे.

विराट कोहलीने 305 वनडे सामन्यात 57.71 धावांच्या सरासरीने 14255 धावा जमविल्या असून त्यात 51 शतकांचा समावेश आहे. वनडे क्रिकेटच्या प्रकारात विराटने सर्वाधिक शतके नोंदविण्याचा विक्रम केला आहे. तसेच त्याने या क्रीडा प्रकारात 75 अर्धशतके नोंदविली आहेत. वनडेमध्ये विराटची 183 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. विराटने वनडे क्रिकेटमध्ये 8 हजार, 9 हजार, 10 हजार, 11 हजार, 12 हजार, 13 हजार आणि 14 हजार धावांचा टप्पा गाठणारा सर्वात वेगवान फलंदाज म्हणावा लागेल. 2011 च्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा, 2013 आणि 2015 आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघामध्ये विराटचा समावेश होता. आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक जमविणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या स्थानावर असून त्याने 37 सामन्यात 59.83 धावांच्या सरासरीसह 5 शतके आणि 12 अर्धशतकांसह 1795 धावा जमविल्या आहेत. विराटने वनडेतील आपले 50 वे शतक मुंबईत न्यूझीलंडविरुद्ध झळकविले.

क्रिकेटच्या टी-20 प्रकारात विराटने 125 सामन्यांत 48.69 धावांच्या सरासरीने 4188 धावा जमविल्या असून त्यामध्ये एकमेव शतक आणि 38 अर्धशतकांचा समावेश आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article