दहियाकडून मेटकरला घिस्सावर आस्मान
संगोळळी रायण्णा उत्सवानिमित्त 30 हून अधिक चटकदार कुस्त्यांचा निकाल
बैलहोंगल तालुक्यातील संगोळळी गावात संगोळळी रायण्णा उत्सवानिमित्त कुस्ती मैदानात हरियाणाचा मल्ल विपिन दहियाने महाराष्ट्रचा मल्ल बालाजी मेटकरला अवघ्या 15 मिनिटातच घिस्सा डावावर अस्मान दाखविले. दहा हजाराहून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकली प्रथम क्रमांकाचे बक्षिस पटकावून कुस्ती शौकीनांची वाहवा मिळविली.बक्षिसात संगोळळी रायणाची प्रतिमा.स्मूतीचिन्ह व 50 हजार रोख रक्क्म देण्यात आली.बैलहोंगल तालुक्यातील संगोळळी गावात कन्नड आणि संस्कूती खाते व जिल्हा प्रशासनाच्या वतीने राज्य व राष्ट्रस्तरीय भव्य निकाली कुस्त्या आयोजित करण्यात आल्या होत्या. सांयकाळी 6 वाजता. प्रथम क्रमांकाची कुस्ती हरियाणाचा मल्ल विपिन दहिया व महाराष्ट्रचा मल्ल बालाजी मेटकर यांच्यात प्रमुख पाहुणे बैलहौगलचे आमदार महांतेश कौजलगी, युवजन खात्याचे उपनिर्देशक श्रीनिवास, बैलहोंगलचे तहशिलदार एच एन शिरहट्टी ता.पं सीईओ किरण घोरपडे, पीएसआय एफ. वाय. मल्लूर यांच्या हस्ते लावण्यात आली.
महिला विभाग
वीरयोध्दा संगोळळी रायण्णा मल्लम्मा उत्सवानिमित्त राज्यस्तरीय महिलांचा कुस्त्या ही बेळगाव जिल्हा प्रशासनाने आयोजन केले होते. यात हल्याळची महिला कुस्तीपट्टू प्रतिक्षा भोवीने महाराष्ट्रच्या मयूरी साळुंखेचा पराभव केला. दुसऱ्या लढत बेळगांवची राधिका तोंडीहाळ व महाराष्ट्रची स्मीता पाटील. व तिसरी लढत धारवाडी पैलवान काव्या दानन्नावर व खानापूरची पैलवान रूतिजा गुरव या दोन्ही लढत बरोबरीत साडविण्यात आल्या. चौथी लढत धारवाडची पुष्पाने हल्याळच्या गंगार्त्रीवर विजय संपादन केला. तर पाचवी लढतीत मुधोळची पैलवान भागश्रीने सुताळ हिच्यावर विजय संपादन केल