For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सविरोधात न्यू कॅलेडोनियामध्ये हिंसक निदर्शने

07:00 AM May 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सविरोधात न्यू कॅलेडोनियामध्ये हिंसक निदर्शने
Advertisement

स्वातंत्र्याच्या मागणीने पकडला जोर : 5 जणांचा मृत्यू : 200 जणांना अटक : रस्त्यांवर रणगाडे तैनात

Advertisement

वृत्तसंस्था /न्यू कॅलेडोनिया

फ्रान्सपासून 16 हजार किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरात असलेल्या न्यू कॅलेडोनिया बेटावर मतदानसंबंधी नियमांवरून तीन दिवसांपासून हिंसक निदर्शने होत आहेत. या बेटावर 171 वर्षांपासून फ्रान्सचे नियंत्रण आहे. येथे झालेल्या दंगलीत आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 200 जणांना अटक केली आहे. फ्रान्सच्या सरकारने याची माहिती स्वत:च्या संसदेत दिली आहे. सरकारने तेथे 12 दिवसांसाठी आणीबाणी लागू केली आहे. यादरम्यान तेथे कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही. विमानतळ आणि बंदराच्या सुरक्षेसाठी पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. तर रस्त्यांवर सैन्याचे रणगाडे गस्त घालत आहेत.

Advertisement

फ्रान्सला विरोध का?

फ्रान्सने अलिकडेच न्यू कॅलिडोनियामध्ये मतदानांचे नियम बदलणारे विधेयक संमत केले होते. या विधेयकाच्या अंतर्गत न्यू कॅलिडोनियामध्ये तेथील मूळ रहिवाशांसोबत फ्रान्समधून तेथे स्थायिक झालेल्या लोकांनाही मतदानाचा अधिकार मिळाला आहे. याप्रकरणी तीन नगरपालिकांमध्ये 5 हजारांहून अधिक निदर्शक या विधेयकाला विरोध करत आहेत. न्यू कॅलेडोनिया एका बेट असून निदर्शकांनी येथे ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावल्याने आवश्यक सेवा ठप्प झाली आहे.

फ्रान्सपासून वेगळे होण्याची मागणी

निदर्शकांनी शहरातील दुकानांमध्ये लूट चालविली असून अनेक दुकाने पेटवून देण्यात आली आहेत. आम्ही आता फ्रान्सपासून वेगळे होऊ इच्छितो असे निदर्शकांचे म्हणणे आहे. मागील काही वर्षांपासून न्यू कॅलिडोनियाचे लोक स्वतंत्र देशाची मागणी करत आहेत. निदर्शकांना रोखण्यासाठी तेथे केवळ 1800 पोलीस कर्मचारी आहेत. सरकारने दंगल रोखण्यासाठी टिकटॉकवर देखील बंदी घातली आहे.

ऑस्ट्रेलियाला चिंता

या दंगलीचा प्रभाव शेजारी देश ऑस्ट्रेलियावरही दिसू लागला आहे. ऑस्ट्रेलियन विदेशमंत्री पेनी वोंग यांनी लोकांना न्यू कॅलिडोनियाचा प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. ऑस्ट्रेलिय सरकार चर्चेच्या बाजूने आहे. न्यू कॅलिडोनियाच्या लोकांनी चर्चेचा मार्ग निवडावा असे वोंग यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.