For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पृथ्वीचे संतुलन बिघडतेय

07:00 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पृथ्वीचे संतुलन बिघडतेय
Advertisement

दिवस होत आहेत मोठे, रात्र होतेय छोटी

Advertisement

रस्त्यावर ड्रायव्हिंग करताना जेव्हा कारच्या चाकाचे अलाइनमेंट बिघडते, तेव्हा कार डगमगू लागते. तशाचप्रकारे पृथ्वी देखील डगमगत फिरत आहे. पृथ्वीचे संतुलन बिघडले आहे. पृथ्वीच्या फिरण्याचा वेगच बदलला असल्याचे एका नव्या संशोधनातून समोर आले आहे. यासाठी सर्वात मोठे कारण हवामान बदल असल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीला या बदलांपासून वाचविण्याची संधी पूर्वी होती, परंतु आता ही बाब हातातून निसटली आहे. हवामान बदलामुळे अत्यंत प्रतिकूल दिवस पहावे लागणार आहेत. पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्याच्या वेगात बदलामुळे माणसांनी एक निगेटिव्ह लीप सेकंद जोडला आहे. कारण हवामान बदलाचा प्रभाव पृथ्वीच्या केंद्रापर्यंत पोहोचला आहे.

पृथ्वीवर एका दिवसात सुमारे 86,400 सेकंद असतात, परंतु अचूक गणना केली जाऊ शकत नाही, कारण पृथ्वीचे प्रत्येक रोटेशन काही मिलिसेकंदांनी बदलले आहे. याचे कारण टेक्टोनिक प्लेट्समध्ये मूव्हमेंट, पृथ्वीचे कोर म्हणजेच केंद्रात बदल आणि चंद्रासोबत गुरुत्वाकर्षणाने ओढणे तसेच हवामान बदल आहे. हवामान बदल सातत्याने पृथ्वीच्या दिवसाच्या कालावधीला बदलत आहे. दिवसाचा कालावधी वाढत आहे. पुढील काही वर्षांमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येणार आहे. तेव्हा दिवस आणखी काही सेकंदांनी मोठा होणार आहे. मागील काही दशकात पृथ्वीच्या ध्रूवीय भागांमध्ये बर्फ वितळण्याचा वेग वाढला आहे. विशेषकरून ग्रीनलँड आणि अंटार्क्टिकामध्ये. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राची पातळी देखील वाढत आहे.

Advertisement

बर्फ वितळण्याचे प्रमाण वाढल्याने अतिरिक्त पाणी हे भूमध्यरेषा म्हणजेच इक्वेटर लाइननजीक जमा होत आहे. यामुळे पृथ्वीचे संतुलन बिघडत आहे. अधिक प्रमाणात पाणी असणे म्हणजे वजन वाढणे, यामुळे पृथ्वीचा वेग कमी होत आहे. याचमुळे दिवसाचा कालावधी वाढत आहे. यासंबंधीचा खुलासा करणारे अध्ययन पीएनएएस नियतकालिकात प्रकाशित झाले आहे. याकरता वैज्ञानिकांनी आर्टिफिशियल इंटेलिजेन्सची मदत घेतली आहे. तसेच सद्यकाळातील सर्व डाटा त्यांनी याकरता वापरले आहेत. पडताळणी केल्यावर पृथ्वीचा फिरण्याचा वेग सातत्याने वाढत जाणार असल्याचे समोर आले. एकेदिवशी पृथ्वी फिरणेच बंद करेल, घड्याळांची वेळ बदलेल, प्राण्यांची झोपण्याची-उठण्याची वेळ बदलेल.

3 दशकांपासून वेग होतोय कमी

12 जुलै रोजी नेचर जियोसायन्समध्ये प्रकाशित  अहवालानुसार वाढत्या उष्णतेमुळे वितळणाऱ्या ग्लेशियरमुळे पृथ्वीच्या भूमध्यरेषेनजीक अधिक पाणी जमा होत आहे. यामुळे पृथ्वी स्वत:भोवती वेगाने फिरू शकत नाहीत. पृथ्वीचे दोन्ही मॅग्नेटिक पोल देखील डगमगले आहेत. याचे कारण मागील तीन दशकांपासून पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावणे आहे.

100 कोटी वर्षांपूर्वी...

100 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा एक दिवस 19 तासांचा होता. नंतर हळूहळू पृथ्वीचा फिरण्याचा वेग मंदावत गेला, यामुळे दिवसाचा कालावधी 24 तासांचा झाला. हा वेळ अत्यंत सुक्ष्म स्तरावर बदलतो. जर 1960 ची तुलना 2020 सोबत केली तर पृथ्वी तेव्हा अधिक वेगाने फिरत होती. 2021 मध्ये हा वेग मंदावू लागला. जून 2022 मध्ये सर्वात छोटा दिवस नोंदविला गेला आहे. प्रत्येक शतकात दिवसाचा कालावधी 2.3 मिलिसेकंदांनी वाढत आहे.

Advertisement
Tags :

.