Miraj : दिल्ली बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ मिरजमध्ये शिवसेनेचे तीव्र आंदोलन
शिवसेनेचा पाकिस्तान विरोधात उग्र निषेध
मिरज : दिल्लीच्या लालकिल्ल्या जवळ दहशतवाद्यांनी बाँबस्फोट सोमवारी घडविला त्यात १२ निष्पाप भारतीय नागरिकांचा बळी गेला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना (शिंदे गट) च्या वतीने उग्र निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील महाराणा प्रताप चौकात शिवसैनिकांनी एकत्र येत पाकिस्तानी ध्वजाचे दहन करुन या बॉम्ब हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
दिल्ली बॉम्ब स्फोट प्रकरणानंतर देशासह राज्यात निदर्शने करण्यात येत आहेत. या बॉम्ब स्फोटाचे पाकिस्तान कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे. मिरजेतील शिवसैनिकांकडून निषेध आंदोलन करण्यात आले. महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. पाकिस्तान विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता पाकिस्तानला बेचिराख करून टाकावे, अशी मागणी करण्यात आली.
विनायक सुर्यवंशी म्हणाले, देशात होत असलेले दहशतवादी हल्ले पाकिस्तान पुरस्कृत आहेत. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्ष म्हणून शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असून, एक शिवसैनिक आणि भारताचा नागरिक म्हणून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत असून शिवसेनेकडून पाकिस्तान बेचिराख करण्याची मागणी केली. यावेळी विजय शिंदे, प्रकाश जाधव यांच्यासह असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.