महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार भडकला

06:48 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

40 हून अधिक जखमी, विद्यार्थ्यांचा सचिवालयाबाहेर गोंधळ

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

शेख हसीना यांच्या पदत्यागानंतर बांगलादेशातील परिस्थिती सुधारेल असे वाटत असतानाच रविवारी रात्री पुन्हा तेथे हिंसाचार उसळला. राजधानीत सचिवालयाजवळ जमलेले विद्यार्थी आणि अन्सार सदस्य यांच्यात जोरदार हाणामारी झाली. या हिंसाचारात 40 हून अधिक लोक जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत होते.

ढाका विद्यापीठाच्या वसतिगृहातून बाहेर पडलेले विद्यार्थी सचिवालयासमोर एकवटले होते. काही वेळातच हजारो विद्यार्थी राजू स्मारकाजवळ जमा झाले. त्यानंतर त्यांनी अन्सार ग्रुपच्या सदस्यांचा सामना करण्यासाठी मोर्चा काढण्याची घोषणा केली. त्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांची पोलिसांशी जोरदार चकमक झाली. अन्सार ग्रुपच्या सदस्यांनी अंतरिम सरकारमधील सल्लागार आणि स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन मुव्हमेंटचे समन्वयक नाहिद इस्लाम, समन्वयक सरजिस आलम, हसनत यांना अटक केल्याचे समजल्यावर विद्यार्थ्यांचा हा संताप समोर आला. अब्दुल्ला आणि इतरांना सचिवालयात नजरकैदेत ठेवल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले. हसनत अब्दुल्ला यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. अटकेसाठी त्यांनी अन्सारचे माजी महासंचालक मेजर जनरल एकेएम अमिनुल हक यांना जबाबदार धरले. त्यांनीच विद्यार्थ्यांना ढाका विद्यापीठात जमण्यास सांगितल्यानंतर हा गोंधळ झाला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article