कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंबुजा सिमेंटच्या सीईओपदी विनोद बहती

06:00 AM Apr 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

संचालक मंडळाची मान्यता: इतरांचीही निवड

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

अदानी समूहातील अंबुजा सिमेंटच्या सीईओपदी विनोद बहती यांची निवड करण्यात आली आहे. अंबुजाच्या संचालक मंडळाने त्यांच्या निवडीला प मान्यता दिली आहे. विनोद बहती हे सीईओसोबतच अतिरिक्त संचालक आणि पूर्ण वेळ संचालक म्हणूनही सेवा बजावणार आहेत. त्यांचा कालावधी हा 3 वर्षांसाठी असणार आहे. दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सिमेंट कंपनी म्हणून अंबुजा सिमेंटची देशात ओळख आहे.

इतरांचीही निवड

दुसरीकडे कंपनीने अन्य काही जणांचीही निवड केली आहे. चीफ फायनान्शिअल ऑफिसरपदी राकेश तिवारी यांचीसुद्धा निवड करण्यात आल्याची माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे. त्याशिवाय प्रवीण गर्ग यांची बिगर कार्यकारी स्वतंत्र संचालक म्हणून तीन वर्षांसाठी नेमणूक केली गेली आहे.

बहतींचा परिचय

विनोद बहती हे एक एप्रिलपासून कार्यभार सांभाळणार आहेत. नव्याने नियुक्त झालेले विनोद बहती हे सध्याला चीफ फायनान्शिअल ऑफिसर असून निर्मिती आणि वित्त उद्योगाशी संबंधित विविध नेतृत्वाचा जवळपास 25 वर्षांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article