व्हिनिसियस, बोनमती यांना फिफाचा पुरस्कार
वृत्तसंस्था/ दोहा
रियल माद्रिदचा स्टार व्हिनिसियस ज्युनियर व बार्सिलोना संघातील आयताना बोनमती यांच्या वर्षातील सर्वोत्तम पुरुष व महिला खेळाडूचा फिफाचा पुरस्कार मिळाला आहे.
गेल्या ऑक्टोबरमध्ये मँचेस्टर सिटीच्या रॉड्रीने बॅलन डीओर पुरस्कार मिळाल्यानंतर 24 वर्षीय व्हिनियस खूपच नाराज झाला होता. त्याच्या निषेधार्थ त्याने व त्याच्या माद्रिद संघाने पुरस्कार वितरण सोहळा टाळला होता. यावेळी 5 गुण कमी मिळाल्याने रॉड्रीला दुसरे स्थान मिळाले. ब्राझीलचा हा आघाडीवीर बक्षीस स्वीकारण्यासाठी फिफाच्या कार्यक्रमास उपस्थित होता. त्याने या मोसमात 39 सामन्यात 24 गोल नोंदवले.
बोनमतीने सर्वोत्तम महिला खेळाडूचा पुरस्कार मिळविला. याआधी तिने बॅलन डीओर पुरस्कारही मिळविला आहे. स्पेनची 26 वर्षीय मिडफिल्डर बोनमतीने सलग दुसऱ्या वर्षी बॅलन डीओर पुरस्कार मिळविला असून यावर्षी तिने बोर्सिलोनासाठी स्पॅनिश लीग, स्पॅनिश कप व चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकल्या आहेत. दोन्ही पुरस्कारासाठी 11 खेळाडूंची यादी करण्यात आली होती. 21 ऑगस्ट 23 ते 10 ऑगस्ट 24 या कालावधीतील कामगिरी पाहून त्यांची यादी तयार करण्यात आली होती.