महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विनेश फोगटचे पॅरीस ऑलिम्पिक तिकीट आरक्षित

06:23 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बिशेक (किर्जीस्तान)

Advertisement

भारताची महिला मल्ल विनेश फोगटने येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकचे तिकीट आरक्षित केले आहे. येथे सुरू असलेल्या आशियाई ऑलिम्पिक पात्र फेरीच्या कुस्ती स्पर्धेत शनिवारी विनेश फोगटने महिलांच्या 50 किलो वजनगटात अंतिम फेरीत प्रवेश मिळविताना आपल्यावर एकही गुण प्रतिस्पर्ध्याकडून करवून घेतला नाही. पॅरीस ऑलिम्पिकसाठी कोटा पद्धतीनुसार स्थान मिळवणारी विनेश फोगट ही भारताची दुसरी महिला मल्ल आहे. यापूर्वी महिलांच्या 53 किलो वजनगटात अंतिम पांगलने पॅरीस ऑलिम्पिकसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.

Advertisement

29 वर्षीय विनेश फोगटने आता तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. यापूर्वी तिने 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तर 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कोटा पद्धतीनुसार भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. मध्यंतरी विश्व कुस्ती फेडरेशनचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या विरोधात विनेश फोगटने कडवा प्रतिकार केला होता. बिशेकमधील या पात्र फेरीच्या स्पर्धेत महिलांच्या 50 किलो वजनगटात कोरियाच्या मिरान चेओनचा केवळ 100 सेकंदाच्या कालावधीत पराभव केला. त्यानंतर पुढील फेरीच्या लढतीत विनेशने कंबोडीयाच्या सेमांग डीटचा केवळ 67 सेकंदात पराभव करत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर उपांत्य फेरीच्या लढतीत फोगटने कजाकस्तानच्या 19 वर्षीय लॉरा गेनीकेजीचा एकतर्फी पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले. विनेशने यापूर्वी निवड चाचणी स्पर्धेतील लढत जिंकल्यानंतर तिने बिशेकच्या स्पर्धेत 50 किलो वजनगटातून पॅरीस ऑलिम्पिकसाठी आपल्या मोहिमेला प्रारंभ केला. 2024 च्या उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी बिशेक स्पर्धेतील विविध वजनगटातील अंतिम फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या मल्लांना कोटा पद्धतीनुसार स्थान दिले जाणार आहे. पॅरीस ऑलिम्पिकसाठी भारताच्या आणि तीन महिला मल्लांना पात्रतेची संधी उपलब्ध झाली आहे. अनशू मलिकने 57 किलो गटात, मानसी अहलावतने 62 किलो गटात तर रितीकाने 76 किलो वजनगटात उपांत्य फेरीत स्थान मिळवले आहे.

57 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 2021 च्या विश्व चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अनशूने किर्जीस्तानच्या कलमीरा ब्लिमबिकोव्हाचा तांत्रिक गुणावर पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. तसेच 76 किलो वजनगटातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या रितीकाने मंगोलियाच्या इनेखमरचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. 62 किलो गटात भारताच्या मानसी अहलावतने कझाकस्तानच्या इरिना कुझेनत्सोवाचा 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. मात्र 68 किलो गटात भारताच्या निशा दाहीयाला उपांत्य फेरी गाठता आली नाही. बिशेकमधील ही पात्र फेरीची स्पर्धा संपल्यानंतर पॅरीस ऑलिम्पिकसाठी शेवटची पात्रतेची स्पर्धा तुर्कीत 9 मे पासून खेळविली जाणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews
Next Article