महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महिला मल्ल विनेश फोगटला सुवर्णपदक

06:33 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ माद्रिद

Advertisement

येथे सुरु असलेल्या 2024 च्या स्पेन ग्रा. प्री. कुस्ती स्पर्धेत भारताची महिला मल्ल विनेश फोगटने 50 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविताना मारिया तियुमेरेकोव्हाचा पराभव केला.

Advertisement

महिलांच्या 50 किलो वजन गटात भारताची विद्यमान राष्ट्रकुल स्पर्धेतील विनेश फोगटने यापूर्वी सलग 3 लढती जिंकून अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. फोगटने पहिल्या लढतीमध्ये क्युबाचा गुझमनचा 12-4 असा पराभव केला. गुझमन ही पॅन अमेरिकन स्पर्धेतील विद्यमान विजेती आहे. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत विनेशने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेती कॅनडाची मॅडीसन पार्क्सचा 9-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीच्या लढतीत विनेशने कॅनडाच्या डुचेकचा 9-4 असा फडशा पाडत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम लढतीत विनेशची कामगिरी दर्जेदार झाली. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी विनेश फोगटने आपले तिकीट आरक्षित केले आहे. 26 जुलैपासून सुरु होणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगट 50 किलो वजन गटात भारताचे प्रतिनिधीत्व करेल. विनेशने 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. पण दुखापतीमुळे तिला दर्जेदार कामगिरी करता आली नाही.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#sports
Next Article