Kolhapur News : कुंभोजमध्ये कामगार तलाठ्यांच्या कारभारावर ग्रामस्थातुन नाराजी; हातकणंगले तहसीलदारांकडून ‘कानउघडणी’
कुंभोजमध्ये कामगार तलाठ्याच्या कारभाराविरोधात ग्रामस्थांचा संताप
कुंभोज प्रतिनिधी ( विनोद शिंगे) : कुंभोज (ता. हातकणंगले) : कुंभोज गावातील कामगार तलाठी यांच्या अकार्यक्षम आणि हलगर्जी कारभारामुळे ग्रामस्थांत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. विविध शासकीय कामांसाठी नागरिकांना वारंवार दिरंगाई, दुर्लक्ष, तसेच अयोग्य वर्तनाचा सामना करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
तलाठी कार्यालयात आवश्यक नोंदी मिळवण्यासाठी नागरिकांना अनेक वेळा फेऱ्या माराव्या लागत असून कामे वेळेत न होताच राहतात. जमीन सातबारा उतारा दुरुस्ती, पीकपाणी नोंद, विविध प्रमाणपत्रे, शेतकरी नोंदी अशा मूलभूत कामांमध्ये सतत अडथळे येत असल्यामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. परिणामी गाव कामगार तलाठ्यांचे शिके सातबारे व काही कागदपत्रावरती कोऱ्यासहया काही खाजगी एजंट त्याच्याकडे दिल्याची ही चर्चा सुरू असून याबाबत हातकणंगले तहसीलदार यांनी त्यांची कान उघडणी केल्याची ही समजत आहे. परिणामी कार्यालयात वेळेत न येणे, ग्रामस्थांशी सभ्य भाषेत न बोलणे अशा विविध तक्रारी गाव काम करतांच्या वरती असून याबाबत कुंभोज मंडल अधिकारी व हातकणंगले तहसीलदार यांच्याकडे तक्रार दाखल झाले आहेत.
या सर्व प्रकारांची माहिती ग्रामस्थांनी थेट हातकणंगले तहसीलदारांकडे देत या कारभाराची चौकशी करून संबंधित कामगार तलाठ्याला कडक ‘कानउघडणी’ करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गावातील शासकीय सेवा सुरळीत आणि वेळेवर उपलब्ध करून द्याव्यात, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
या तक्रारींचा तपास करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे तहसील कार्यालयातील सूत्रांनी सांगितले असून पुढील काही दिवसांत परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.