Satara : लिंब ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
लिंब ग्रामपंचायतीवर भ्रष्टाचाराचे आरोप
सातारा : लिंब ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार आहे. पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखड्यात कामे नसतानाही परस्पर बिले काढली आहेत. ग्रामनिधी परस्पर रोखीने खर्च केला आहे, असा आरोप करत लिंब येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
हे आंदोलन भाजपाचे राजेश शेटे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की १४व्या वित्त आयोगाची सातारा आंदोलनास बसलेले लिंब ग्रामस्थ, आणि १५व्या वित्त आयोगाच्या कामाची माहिती माहिती अधिकारात मागितली असता ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी दिली नाही. माहिती दिली जात नाही. टाळाटाळ केली जाते.
मोठा गैरव्यवहार झाला असून संबंधित ग्रामपंचायत अधिकारी सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. अन्य ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नसल्याने हे आंदोलन करत असल्याचे नमूद केले आहे.