For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केणी येथील नियोजित खासगी वाणिज्य बंदराला ग्रामस्थांचा विरोध

10:40 AM Mar 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
केणी येथील नियोजित खासगी वाणिज्य बंदराला ग्रामस्थांचा विरोध
Advertisement

बुधवारी पुन्हा आंदोलन : केणी परिसरात जमावबंदीचा आदेश

Advertisement

कारवार : केणी येथील नियोजित खासगी वाणिज्य बंदराच्या विरोधात बुधवारी पुन्हा एकदा मच्छिमारी बांधवांकडून आंदोलन छेडण्यात आले. केणी परिसरात जिल्हा प्रशासनाने 15माचपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू केला आहे. जिल्हा प्रशासनाच्या जमावबंदीच्या आदेशाला न जुमानता छेडण्यात आलेल्या या आंदोलनात हजारो मच्छीमारी समाजबांधव सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा समावेश अधिक होता. मच्छीमारी समाजाच्या महिलांनी बंदराला विरोध दर्शविण्यासाठी केणी समुद्र किनाऱ्यावर मानवी साखळी तयार केली होती.  संतप्त महिलांनी नियोजित प्रकल्पाच्या निषेधार्थ कपाळाला काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या.

गो बॅक पोर्ट अशा जोरदार घोषणा दिल्या जात होत्या. अनेक मच्छीमारी बांधवांनी मासेमारीसाठी होड्या थांबवून बंदराला आपला विरोध केला. केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘सागरमाला’ योजनेंतर्गत अंकोला तालुक्यातील भावीकेरी ग्राम पंचायतीच्या व्याप्तीतील केणी येथील समुद्र किनाऱ्यावर जेएसडब्ल्यु या खासगी कंपनीकडून बारमाही वाणिज्य बंदर उभारण्याच्या कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. तथापि या बंदराला स्थानिक पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मच्छीमारी बांधवांचा विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत बंदर होऊ देणार नाही. बंदर आमचे नाही, असा निर्णय स्थानिकांनी घेतला आहे.

Advertisement

या नियोजित बंदरामुळे केवळ मासेमारी व्यवसायच नव्हे तर शेती व्यवसायही धोक्यात जाणार आहे. शिवाय भविष्यात या बंदरातून होणाऱ्या पेट्रोलियम खनीज पदार्थ आदींची आयात, निर्यातेमुळे पर्यावरणाचा धोका निर्माण होणार आहे. भारतीय संरक्षण खात्याने सीबर्ड प्रकल्पाच्या उभारणीसाठी कारवार आणि अंकोला तालुक्यातील सतरा समुद्रकिनारे ताब्यात घेतले आहेत. बंदर उभारणीसाठी केणी समुद्र किनारा ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला.

Advertisement
Tags :

.