तोंडवळी सुरुबन रस्त्याचे ग्रामस्थांचे स्वप्न पुर्ण होणार : आ . वैभव नाईक
तोंडवळी सुरुबन रस्त्याच्या कामाचा वैभव नाईकांच्या हस्ते शुभारंभ
आचरा प्रतिनिधी
जगभरातील पर्यटक देवबाग तारकर्ली नंतर तोंडवळी तळाशील भागाला पसंती देत आहेत तोंडवळी हे पर्यटनस्थळ म्हणून समोर येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या गावातील अनेक प्रश्न मार्गी लावलेत मात्र आताचे सत्ताधारी हे विकासकामांना खिळ घालत आहेत त्यानीं अनेक शब्द आपणा ग्रामस्थांना दिलेत मात्र एकही पुरा केला नाही रस्ता व्हावा म्हणून विद्यमान सरपंच उपसरपंच सातत्याने माझ्याशी पाठपुरावा करत होते. या रस्त्याला निधी मिळत होता पण वनखात्याची परवानगी मिळत नव्हती त्यामुळे मंजूर निधी मागे जात होता पण यावेळी मी पहिली परवानगी आणली आणि ताबडतोब निधी दिला आहे. त्यामुळे या रस्त्याचे स्वप्न पुर्ण होणार असल्याचे तोंडवळी सुरुबन रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आमदार नाईक यांनी सांगितले.
गेली कित्येक वर्षे वानखात्याच्या जाचक अटीमुळे तोंडावळी सुरुबन रस्ता रखडललेला होता ग्रामस्थांनी अनेक आंदोलने उपोषणे करूनही रस्ता मार्गी लागत नव्हता मात्र यावेळी आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत तोंडवळी सुरुबन रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणेसाठी रक्कम - १८ लाख ९७ हजार रु.निधी उपलब्ध करून दिला असल्याने रखडलेला तोंडावळी सुरुबन रस्ता मार्गी लागणार आहे या रस्त्याचे भूमिपूजन ग्रामस्थांच्या उपस्थितीत आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उबाठा शिवसेना जिल्हा प्र. वक्ते. मंदार केणी,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, समीर लब्दे,तोडंवळी युवासेना शाखाप्रमुख राजा पेडणेकर, माझी उपसरपंच संजय केळुसकर, आचरा माझी सरपंच मंगेश टेमकर, तोंडवळी सरपंच नेहा तोंडवळकर, उपसरपंच हर्षद पाटील,ग्रामपंचायत सदस्या मानसी चव्हाण,अनन्या पाटील,नाना पाटील, दीपक कांदळकर, वायंगणी ग्रा.पं.सदस्य श्रीकृष्ण वायंगणकर,दिलीप पुजारे, महेश चव्हाण, मिलिंद वायंगणकर, दिक्षा गोलतकर, बंटी गोलतकर, अना हडकर, गणेश पाटील, अमित पाटील सिद्धेश पाटील, स्नेहल पाटील, गीता पाटील,मधुकर पाटील,बाबल नाईक, ज्योती हडकर, प्रमोद पाटील, ओंकार पाटील तसेच तोडंवळी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी काम करणाऱ्या माणसाला ताकद द्यावी :नाईक
काही दिवसांनी विधानसभा निवडून होऊ घातली जाणार आहे या भागातून आमदारकीची निवडूक मी लढवणार आहे आपण ग्रामस्थ गेली दोन टर्म माझ्या सोबत राहिलात मला निवडून दिलेत मी सातत्याने लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले आहे. यावेळीही आपण ग्रामस्थ माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहात यात शंका नाही काम करणाऱ्या माणसाला ताकद दिलीत तर येणाऱ्या काळात या भागाचा विकास शक्य आहे. म्हणूनच तुमचे प्रोत्साहन मला आवश्यक असल्याचे आमदार वैभव नाईक म्हणाले.
ग्रामस्थांनी मानले वैभव नाईकांचे आभार
आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने तोंडवळी तळाशील भागातील प्रश्न मार्गी लावलेत भूमिगत विद्युत वाहिनी, बांधऱ्याचा प्रश्न असो तोंडवळी गावाला जोडणारा सापळेबाग रस्ता अशी विविध कामे मार्गी लावलीत गेली 25 वर्ष रखडलेला सुरुबन रस्ताही यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यामुळे होणार आहे. येणाऱ्या काळात आम्ही ग्रामस्थ आमदार नाईक यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहणार असल्याचे सांगत ग्रामस्थांनी वैभव नाईक यांचे आभार मानलेत.