महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘पी.एम.किसान’साठी आजपासून गावपातळीवर मोहीम

11:20 AM Dec 13, 2024 IST | Radhika Patil
Village level campaign for 'PM Kisan' starts today
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून कार्यरत असून आजअखेर 18 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. या योजनेतून 4 लाख 78 हजार 427 लाभार्थींना 1205.24 लाख रुपये निधी थेट बँक खात्यात जमा झाला आहे. योजनेतील 19 वा हप्ता लवकरच वितरीत होणार असून विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी सुमारे 20 हजार 798 लाभार्थी आगामी हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात. यासाठी जिह्यात 13 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2025 या कालावधीत मोहीम राबवून शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण, स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे आणि भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींची पूर्तता करण्यात येणार आहे.

Advertisement

ही मोहिम 15 जानेवारी 2025 पर्यन्त चालणार आहे.  या महिमेदरम्यान काही सुचनांचे पालन करणे आवश्यक असून त्यामध्ये ई-केवायसी प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 6 हजार 426 लाभार्थ्यानी ई केवायसी करणे आवश्यक असून महा ई-सेवा केंद्र किंवा गावच्या कृषी सहायकाशी संपर्क करुन पी. एम. किसान मोबाईल अॅपमधून चेहरा स्कॅन करावा किंवा अंगठा स्कॅन करुन बायोमेट्रिक पद्धतीने ई-केवायसी करुन घ्यावी. नव्याने नोंदणीसाठी 666 लाभार्थी प्रलंबित असून त्यांनी महा ई-सेवा केंद्रातून अलीकडचा 7/12, फेरफार, पती-पत्नी आधार कार्ड, वारस नोंद असल्यास फेब्रुवारी - 2019 पूर्वी जमीन धारणा असलेला फेरफार पोर्टल वर अपलोड करावयाचे आहे. बँक आधार सिडिंगसाठी 10 हजार 670 लाभार्थी प्रलंबित असून त्यांनी नजिकच्या बँक शाखा किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधून बँक शाखेशी संपर्क करुन आपले अद्यावत असलेले आधार कार्ड बँक खाती संलग्न करुन घ्यावे किंवा नजीकच्या पोस्टात अऊ ाहंत् असलेले खाते उघडावे. भूमी अभिलेख नोंदी अद्यावत करण्यासाठी 3 हजार 36 लाभार्थी प्रलंबित असून तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधून भूमिअभिलेख नोंदी संबधित माहिती अद्यावत करावी.

कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी शेतकऱ्यांनी स्वत: उपस्थित असणे आवश्यक

पी. एम. किसान योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणिकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे, भूमि अभिलेख नोंदी अद्यावत करणे या बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर असणे आवश्यक आहे.

नमो शेतकरी महासन्मान’ साठी 21 डिसेंबरपर्यं मुदत

पी. एम. किसान योजनेचा 19 वा हप्ता माहे फेब्रुवारी 2025 च्या शेवटच्या आठवड्यात वितरीत करणार आहे. तसेच पी. एम. किसान योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थींनाच राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान’ निधी योजनेचा लाभ होईल. या दोन्ही योजनांच्या लाभासाठी 21 डिसेंबर 2024 पर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता या मोहिमेदरम्यान करावी. अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article