For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विक्रांत मैसीच्या नव्या चित्रपटाची घोषणा

06:47 AM Aug 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
विक्रांत मैसीच्या नव्या चित्रपटाची घोषणा
Advertisement

सेक्टर 36 असणार नाव

Advertisement

बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसी सध्या तापसी पन्नू आणि सनी कौशल यांच्यासोबत ‘फिर आई हसीन दिलरुबा’मध्ये दिसून आला आहे. त्याच्या या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याचदरम्यान आता विक्रांतच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा झाली आहे.

अभिनेत्याचा हा आगामी चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार असून त्याचे नाव सेक्टर 36 असणार आहे. निर्मात्यांनी याचे पोस्टर शेअर करत याच्या प्रदर्शनासंबंधी माहिती दिली आहे. या पोस्टरमध्ये विक्रांत एका वेगळ्या अवतारात दिसून येत आहे. या चित्रपटाची निर्मिती मॅडॉक फिल्म्सकडून केली जाणार आहे.

Advertisement

या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य निंबाळकर करणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर 13 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. विक्रांत मैसी आणि दीपक डोबरियाल या क्राइम थ्रिलर चित्रपटात काम करत आहेत. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असल्याचे समजते. या चित्रपटात सत्ता, अपराध आणि सामाजिक विषमतेवर आधारित कहाणी दर्शविण्यात येणार आहे. आदित्य निंबाळकर हा या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करणार आहे.

Advertisement
Tags :

.