‘सेक्टर 36’चा ट्रेलर सादर
सीरियल किलरच्या कहाणीवर आधारित चित्रपट
12 फेल चित्रपटाद्वारे चाहत्यांची मने जिंकणारा कलाकार विक्रांत मैस आता एका क्रूर खुन्याच्या भूमिकेत दिसून येणार आहे. त्याचा पुढील चित्रपट ‘सेक्टर 36’ घोषित झाला आहे. यात त्याने सीरियल किलरची भूमिका साकारली आहे. सत्यघटनेवर आधारित या चित्रपटाची निर्मिती स्त्राr 2 च्या निर्मात्यांनी केली आहे.
सेक्टर 36 चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात विक्रांतसाब्sात दीपक डोबरियाल हा अभिनेताही दिसून येणार आहे. चित्रपटात विक्रांत मैसी खलनायकाच्या भूमिकेत असून परिसरातील छोट्या मुलांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करताना ट्रेलरमध्ये दिसून येतो. सीरियल किलरच्या रुपातील विक्रांतचा नवा अवतार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. तर दीपक डोबरियालने यात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.
2006 मधील नोएडाच्या सेक्टर 36 च्या निठारी भागातील नाल्यात अनेक लहान मुलांचे सांगाडे सापडल्याने खळबळ उडाली होती. एका माथेफिरू व्यक्तीने निष्पाप मुलांचे अपहरण करत त्यांची हत्या केली होती. या घटनेला निठारी कांड म्हणून ओळखले जातात. आता मॅडॉक फिल्म्सने यावर सेक्टर 36 हा चित्रपट तयार केला आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.