कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ध्रुव नचतिरम’मध्ये विक्रम

06:21 AM Mar 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दाक्षिणात्य अभिनेता चियान विक्रम सध्या आगामी चित्रपट ‘ध्रुव नचरितम’वरुन चर्चेत आहे. गौतम वासुदेव मेनन याचे दिग्दर्शन करत आहेत. विक्रमने यापूर्वी मणिरत्नम यांचा चित्रपट पोन्नियिन सेल्वमध्ये ऐश्वर्या राय बच्चनसोबत भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती.

Advertisement

ध्रुव नचतिरम हा चित्रपट  24 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितु वर्मा ही विक्रमच्या नायिकेच्या भूमिकेत आहे. ध्रुव नचतिरम हा बहुप्रतीक्षित तमिळ चित्रपट आहे. या चित्रपटाची कहाणी मेनन यांनीच लिहिली आहे. या चित्रपटात विक्रम तसेच रितुसोबत ऐश्वर्या राजेश, राधिका सरथकुमार, अर्जुन दास, सिमरन, डीडी, आर. पार्थिवन हे कलाकार दिसून येणार आहेत. या चित्रपटाला हॅरिस जयराज यांचे संगीत लाभले आहे. विक्रमने यात न्यूयॉर्क येथील अंडरकव्हर एजंटची भूमिका साकारली आहे. तो आणि त्याची टीम एका गुप्त मोहिमेत सामील असून याचे नेतृत्व मिस्टर करत असल्याचे दाखविण्यात येणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article